Nashik Lok Sabha Voting | नाशिकमध्ये इतके मतदान; राजाभाऊंचे सिन्नर आघाडीवर

0
24
Vidhanparishad
Vidhanparishad

Nashik Lok Sabha Voting |  राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या मतदार संघांपैकी एक म्हणजे नाशिक लोकसभा मतदारसंघ. हा मतदार संघ आज मतदानाच्या दिवशीही चांगलाच चर्चेत राहिला. दरम्यान, आज तीन वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली असून, नाशिकमध्ये ३९.४१ टक्के इतके मतदान पार पडले आहे.

सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान 

सकाळी ७ वाजेपासून येथे मतदान सुरू असून, दुपारी तीन वाजेपर्यंतची विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची आकडेवारीनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा सिन्नर मतदार संघ हा आघाडीवर आहे. नाशिकमध्ये सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात मतदान झाले. पण दुपारी नाशिकमध्ये मतदान थंडावले आहे.  आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली असून, नाशिकमध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे. (Nashik Lok Sabha Voting)

Dindori Loksabha Voting | दिंडोरी आघाडीवर; ‘या’ तालुक्यांमध्ये सर्वाधिक मतदान

Nashik Lok Sabha Voting | विधानसभानिहाय आकडेवारी –  

नाशिक लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ३९.४१ % इतके मतदान पार पडले आहे.

  1. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ – ४०.२१ %,
  2. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ – ३८.१२ %
  3. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ – २४.७२ %
  4. देवळाली विधानसभा मतदारसंघ – ४०.२९ % ,
  5. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ – ४४.७७ %
  6. सिन्नर विधानसभा मतदारसंघ – ४५.३० %  (Nashik Lok Sabha Voting)

Nashik Lok Sabha Election | नाशकात आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची; घाबरून मतदारांची पळापळ


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here