Nashik Lok Sabha | राजकीय पक्षांच्या सभा, रोड शो; अन् शांतीगिरी महाराजांचा प्रचाराचा फंडा

0
27
Nashik lok Sabha
Nashik lok Sabha

Nashik Lok Sabha | नाशिकमध्ये येत्या २० मे रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून, आता सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष नाशिककडे लागले आहे. कालच महायुतीच्या दोन्ही (Mahayuti) उमेदवारांसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मैदानात उतरले होते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही नाशिकचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तर, दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवारमैदानात उतरले होते.

या तिन्ही नेत्यांच्या एकाच दिवशी नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आल्याने नाशिकचे वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, आजही महायुती आणि मविआच्या बड्या नेत्यांच्या सभा असल्याने या लढतीची रंगत आणखी वाढली आणि ही लढत आता हायव्हॉल्टेज झाली आहे.

मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीच्या या बड्या नेत्यांमध्ये जुंपलेली असताना आणि नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरु असतानाच नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी रॅली काढत त्र्यंबकेश्वर येथे भक्त परिवारासह जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Nashik lok Sabha | शांतीगिरी महाराजांचा जाहीरनामा; बघा काय आहे बाबांचे नाशिकचे व्हीजन..?

Nashik Lok Sabha | शांतीगिरी महाराजही कोणापेक्षा कमी 

तर, यानंतर आज त्यांनी प्रचाराचा अजब फंडा शोधला असून, शांतीगिरी महाराजांनी थेट सायकलवरून प्रवास करत नाशिकमध्ये प्रचार केला. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार हे एकमेकांच्या तोडीचे असतानाच यात शांतीगिरी महाराजांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक लोकसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली असून, ही निवडणूक चुरशीची असणार आहे.

कारण मतदानासाठी आता अवघे काही शिल्लक राहिल्याने जसे महायुती आणि मविआकडून वेगवेगळे फंडे आजमावले जात आहेत. तसेच शांतीगिरी महाराजही प्रचारात नवनवीन फंडे वापरत असून, आपणही कोणापेक्षा कमी  नसल्याचे ते जणू संगत आहेत.

कधी रथ, कधी बैलगाडी अन् आता सायकल

शांतीगिरी महाराज कधी रथातून, कधी बैलगाडीतून तर, पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश  देत ते आता सायकलवरूनही प्रचार करताना दिसताय. राजकीय पक्षांकडून मोठमोठ्या सभा, रोड शो सुरू असताना शांतीगिरी महाराजांच्या फंड्यानी मतदारांचे लक्ष वेधले आहे.

Nashik Lok Sabha | नाशिकमध्ये ‘ट्विस्ट पे ट्विस्ट’; आप्पांनी सूड घेतला की काय..?

माघार घ्यावी यासाठी भाजपचे मोठे प्रयत्न

दरम्यान, “निवडणुकीतून शांतीगिरी महाराजांनी माघार घ्यावी. यासाठी भाजपने खूप प्रयत्न केले. आम्ही माघार घ्यावी. यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे मला भेटले होते. तसेच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घालवून देणार होते. मात्र, मी स्वतः प्रचारात व्यस्त असल्यामुळे वेळेअभावी मी पंतप्रधानांना भेटू शकलो नाही. पण आता आपली निवडणुकीतून माघार नाही”, असे शांतीगिरी महाराज म्हणले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here