Nashik lok Sabha | नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज आपला जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला असून, यात त्यांनी नाशिककरांना मोठमोठी आश्वासनं दिली आहेत. तसेच त्यांनी यावेळी आपले नाशिकसाठीचे व्हिजन मांडले.
“आता नाशिकमध्ये भगवं वादळ आलं असून, आज आम्ही निवडणुकीसाठीचा वचननामा सादर करत आहोत. “लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा” हा आमचा नारा असून, आम्ही जे बोलणार ते करून दाखवणार असा आमचा संकल्पच आहे. तसेच आम्हाला खात्री आहे की, या राजकारणाच्या माध्यमातून आम्ही जनतेचे ऋण फेडणार”, असे यावेळी शांतीगिरी महाराज म्हणाले. (Nashik lok Sabha)
राम मंदिरासाठी योगी आदित्यनाथ यांना विराजमान व्हावे लागले
हा पूर्ण ‘जय बाबाजी’ भक्त परिवाराचा वचननामा आहे. जसे तिकडे संसद भवन आहे. तसे आम्ही येथे ‘खासदार भवन’ तयार करणार असून, तिथे जी समस्या येईल ती आम्ही सोडवू. आगळं वेगळं काम आम्ही करून दाखवणार आहोत. तसेच स्नान करता येईल अशी गोदावरी नदी स्वच्छ करणार. अयोध्येत राम मंदिर झाले पण त्यासाठी संन्यासी योगी आदित्यनाथ यांना गादीवर विराजमान व्हावे लागले. (Nashik lok Sabha)
Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांनी गुन्हा लपवला..?; उमेदवारीचे भवितव्य धोक्यात
जे पूर्ण होऊ शकले नाही, ते आम्ही पूर्ण करणार
नाशिकमध्ये अंजनेरी गड येथे आम्ही ‘हनुमान जन्मभूमी’ साकारणार असून, येथे अयोध्येप्रमाणे आम्ही विकास करू. सेंद्रिय खतांचा कारखाना उभारणार असून, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणार. नाशिकमध्ये मेट्रो आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आयटी पार्कसाठी प्रयत्न केले जातील. जे पूर्ण होऊ शकले नाही तेदेखील आम्ही पूर्ण करू. (Nashik lok Sabha)
Nashik lok Sabha | आम्ही पगार घेणार नाही
जर शांतीगिरी महाराज हर खासदार झाले. तर, आम्ही पगार घेणार नाही. उलट तो पगार जनसेवेसाठी वापरू. आमच्याकडे टक्केवारीला थारा नसेल. २० लाख आम्हाला निधी आल्यास त्यात आणखी ११ हजार आम्ही भक्तांकडून घेऊन टाकू, असेही त्यांनी जाहीर केले.
Shantigiri Maharaj | शांतीगिरी महाराजांच्या माघारीसाठी महायुतीचे जोरदार प्रयत्न
जाहीरनाम्यात ‘या’ मुद्यांवर भर
शांतीगिरी महाराजांच्या जाहीरनाम्यात पुढील मुडद्यांवर अधिक भर देण्यात आला असून, शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत कोणासाठी काय करणार हे यात जाहीर केले आहे. असे आहे शांतीगिरी महाराजांचा नाशिकसाठीचे व्हीजन..
१. शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य –
नाशिक लोकसभा मतदारसंघात शेतकरी विकास केंद्र उभारणार, शेतमालाला हमीभाव देणार, २४ तास वीज व पाणी सुविधा पूरवणार. (Nashik lok Sabha)
२. नागरी सुविधा –
पुढील २५ वर्षांचा विचार करून आराखडा तयार करणार, शहरातील वाहतूक कोंडी सोडवणार
३. उद्योग –
नाशिकमधील तरुणांना त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही. नाशिकसाठी आयटी पार्कचा पाठपुरावा, स्टार्ट अपसाठी प्रयत्न करणार आहोत.
४. कनेक्टिव्हिटी –
शहरात शिक्षण, योग व संस्कृत विद्यापीठ उभारणार, नाशिकमधील तीर्थक्षेत्रांचा विकास करणार, अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणार, नाशिकमध्ये आदर्श कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न करणार.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम