Nashik Lok Sabha Result | पराभवाची जबाबदारी स्वीकारत भूसेंनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली

0
27
Nashik Lok Sabha Result
Nashik Lok Sabha Result

Nashik Lok Sabha Result | संपूर्ण लोकसभा निवणुकीत राज्यात नाशिक लोकसभा मतदार संघ हा चर्चेत राहिला. राज्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली होती. यापैकी एक मतदार संघ हा नाशिकही होता. नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना महायुतीकडून तिसऱ्यांदा संधी देण्यात आली होती. तर, त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) हे मैदानात होते. या अटीतटीच्या लढतीत सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवत राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली आणि एक लाख साठ हजार मतांनी गोडसे यांचा पराभव केला.

दरम्यान, नाशिक हा शिवसेनेचा हक्काचा बालेकिल्ला असल्याने नाशिकचा पराभव हा शिवसेनेला चांगलाच महागात पडला असून, आता नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (Dada Bhuse) यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. वास्तविक पाहता विजय करंजकर यांची माघार आणि त्यांचा शिंदे गटात प्रवेश यात दादा भुसे यांची महत्त्वाची भूमिका होती. तसेच हेमंत गोडसेंना पाठिंबा देत शांतिगिरी महराजांनी माघार घ्यावी, यासाठीही त्यांनी मोठे परिश्रम घेतले. मात्र, त्यांच्या मेहनतीला इच्छित यश आले नाही.(Nashik Lok Sabha Result)

त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारत दादा भुसे म्हटले की, “नाशिकमधील महायुतीच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी पराभवाची जबाबदारी घेत आहे. तसेच नाशिकमधील या अपयशाचे कारण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना सांगणार असून, याबाबतचा अहवालदेखील मी त्यांच्यासमोर सादर करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले.

Nashik News | आत आजी माजी खासदारांची ‘गळाभेट’; बाहेर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

Nashik Lok Sabha Result | तर मीदेखील राजीनामा देईल…   

या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला असून, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदावरून पदमुक्त करण्याची विनंती भाजपच्या पक्ष श्रेष्ठींकडे करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे तुमची पण राजीनामा द्यायची तयारी आहे का? असा प्रश्न दादा भुसे यांना पत्रकारांनी केला असता,  यावर ते म्हणाले की, “तुम्ही सांगत असाल तर मीदेखील राजीनामा देईल, अशा शब्दांत त्यांनी राजीनामा देण्याचीही तयारी दर्शविली.

कोणी काम केले नाही हे सर्वांना माहिती – गोडसे 

रम्यान, यावेळी हेमंत गोडसे म्हणाले की,”मला उमेदवारी उशिरा जाहीर झाली त्यामुळे नाशिकमध्ये हा निकाल आला. महाराष्ट्रात केंद्राच्या शेतकरी धोरणामुळेही फटका बसला. भाजपचे उमेदवार घोषित झाले. तेव्हाच पक्षाने उमेदवार घोषित करणे गरजेचे होते. विरोधी उमेदवाराला जास्त दिवस मिळाल्यानेही आम्ही डॅमेज झालो. मतदारांमध्ये हेमंत गोडसे हे उमेदवार असणार की, नाही याबाबतर संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा मला फटका बसला.(Nashik Lok Sabha Result)

तरी माझा कोणावरही रोष नाही. सर्वांकडूनच चांगले काम झाले. कोणी काम केलेले नाही आणि कोणाची ताकद मिळाली नाही हे सर्वांना माहिती असल्याची टिकाही त्यांनी मंत्री छगन भुजबळांचे नाव न घेता केली. तसेच आपण आपले राजकीय काम सुरू ठेवणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बोलले की, खचून न जाता आपले काम सुरू ठेवा.

Chandwad – Deola | आहेर समर्थकांचे दावे फोल; चांदवड नाही फक्त देवळा तालुक्यातून ताईंना लीड


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here