Nashik Lok Sabha Result | नाशिकमध्ये वारे फिरल्याचे दिसत आहे. सुरुवातीला ही लढत तिरंगी असल्याचे दिसत होते. मात्र, एकामागोमाग एक धक्कादायक आकडे समोर येत असून, ही लढत एकतर्फी असल्याचेच दिसत आहे. सुरुवातीपासूनच ठाकरे गटाचे राजभाऊ वाजे हे आघाडीवर असून, पहिल्या फेरीत तब्बल १०,००० मतांनी राजाभाऊ वाजे हे आघाडीवर होते. तर, आताही राजभाऊ वाजे यांनी मोठी आघाडी घेतली असून तब्बल ३६, ३४० मतांनी राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत.Nashik Lok Sabha Result
महत्त्वाच्या जागा महायुतीच्या हातून जाणार..?
उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पसंती मिळत असल्याचे दिसत असून, महत्त्वाच्या जागाच महायुतीच्या घटक पक्षांच्या हातून जाता की काय..? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे. नाशिकची जागा ही शिवसेनेचा बालेकिल्ला असून, येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत आहे.
Dindori Lok Sabha Result | दिंडोरीत तुतारी वाजतेय; कांद्याने भाजप उमेदवाराचा वांदा केला..?
Nashik Lok Sabha Result | लढत एकतर्फी हीते की काय..?
विद्यमान खासदार हेमंत गोडसे, ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे, आणि अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे रिंगणात होते. सुरुवातीला ही लढत तिरंगी असल्याचे दिसत असले. तरी, आता जसजशी आकडेवारी समोर येत आहे. तशी ही लढत एकतर्फी हीते की काय..? असे दिसत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीत भास्कर भगरे, धुळे लोकसभा मतदार संघात कोंग्रेसच्या शोभा बच्छाव य आघाडीवर आहेत. तर, नंदुरबार ६८,००० मतांनी गोवाल पाडवी आघाडीवर आहेत. रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. Nashik Lok Sabha Result
Nashik Lok Sabha Result | गोडसेंना मोठा धक्का; पहिल्या फेरीत मशाल धगधगली
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम