Nashik Lok Sabha | संकटमोचकांची गुप्त खलबतं; तर, भुजबळ फार्मवरही मोठ्या हालचाली

0
58
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha |  महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी काल जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे, अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. ३ मे ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, अद्यापही महायुतीत कुठलेच नाव ठरत नाहीये. तर रोज नवीन इच्छुक उमेदवारांचे नाव समोर येत आहे. काल शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज  नाशिक लोकसभेच्या वादात आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. आज अचानक भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे तडकाफडकी नाशिकमध्ये आले आहेत. (Nashik Lok Sabha)

नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात चांगलीच जुंपली होती. मात्र, त्यांनी माघार घेतल्यानंतर रोज नवनवीन इच्छुकांची नावे समोर येत आहे. यानंतर आता गिरीश महाजन हे अचानक नाशिक दौऱ्यावर आले असून, ते महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेत आहेत. (Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | शांतीगिरी महाराजांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज..!

Nashik Lok Sabha | गिरीश महाजनांच्या गुप्त बैठका

गिरीश महाजन हे आज अचानक नाशिकमध्ये आले असून, येथे त्यांनी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या आहेत. नाशिकचा महायुतीचा उमेदवार ठरत नसताना आणि काल शांतिगिरी महाराजांनी भरलेल्या उमेदवारी अर्जाच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांचा नाशिक दौरा हा चर्चेचा विषय ठरला आहे. तर, नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं नियोजनदेखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभेत नवा ट्विस्ट; भुजबळांची तिरकी राजकीय चाल..?

भुजबळ फार्मवरही मोठ्या हालचाली

एकीकडे भाजपच्या गोटात मोठ्या हालचाली होत असताना, आता दुसरीकडे भुजबळ फार्मवरही काही मोठ्या हालचाली होताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी हे छगन भुजबळांच्या भेटीला दाखल झाले होते. दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवार (Bharti Pawar), नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav), माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) व इतर पदाधिकाऱ्यांनी भुजबळांची भेट घेतली. दरम्यान, आता पुढे नाशिकच्या राजकारणात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Nashik Lok Sabha)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here