Nashik Lok Sabha | नाशिक भाजपचा बालेकिल्ला, पण…; संकटमोचकांनी मौन सोडलं

0
32
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha | महायुतीत नाशिकच्या जागेवेरून खडाजंगी सुरू असून, नाशिकचे राजकीय महत्त्व पाहता सर्वच पक्षांना वाटते की, ही जागा आपल्याकडे असावी. यामुळे महायुतीतील तिन्ही पक्ष या जागेसाठी आग्रही आहेत. श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. यानंतर भाजप पदाधिकारी आक्रमक झाले.(Nashik Lok Sabha)

दरम्यान, मध्यंतरी भुजबळ यांचे नाव चर्चेत आले आणि काल भुजबळ यांनी आपल्या नावाचा निर्णय हा थेट दिल्लीतून झाला असल्याचा दावा केला. तर, दुसरीकडे उमेदवारीची घोषणा झाली नसतानाही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचाराचे नारळ फोडले आहे आणि तिसरीकडे नाशिकची जागा आपल्याला न मिळाल्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. (Nashik Lok Sabha)

दरम्यान, अखेर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी याबाबत मौन सोडले असून ते म्हणाले की, “असं सगळ्यांनाच वाटतंय की, नाशिकची जागा ही आपल्याला मिळावी. ही शिवसेनेची सीटिंग जागा असून, राष्ट्रवादीला देखील वाटतंय की, ही जागा त्यांना दिली जावी. आमचे नाशिक लोकसभा मतदारसंघात तीन आमदार, आणि  जवळपास ७० नगरसेवक आहेत. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

Nashik Lok Sabha | यंदा निवडणुकांचा प्रचार महागला; व्हेज आणि नॉनव्हेज थाळींचेही दर ठरले

Nashik Lok Sabha | गोडसेच काय सगळ्यांचेच म्हणणं आहे की… 

तसेच यावेळी ते पुढे म्हणाले की, “ही शेवटी महायुती आहे. शिल्लक जागांच्या वाटाघाटी या आता शेवटच्या टप्प्यात आहेत. तर आपल्या मित्रपक्षाला काही हक्काच्या जागा या द्यावाच लागणार आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची चर्चा सुरु आहे. तर, जागा वाटपाचा सगळा निर्णय हा दिल्लीत पार्लमेंटरी बोर्ड घेणार आहे. (Nashik Lok Sabha)

मंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले असून, याबाबत मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “छगन भुजबळांना कोणी काय सांगितले आहे. याची मला काही कल्पना नाही. अंतिम यादी ही एक-दोन दिवसात येईल, आपल्याकडे वेळ कमी आहे. गोडसेच काय सगळ्यांचेच म्हणणं आहे की, नाशिकची जागा आम्हाला मिळावी. (Nashik Lok Sabha)

Nashik Loksabha | दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ; नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी

 तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ लोकांवर आलीय

दरम्यान, उद्धव ठाकरे ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केली की, “फडणवीसांनी एखादा बॉलिवूडचा निर्माता शोधावा आणि ‘मणिपूर फाईल्स’ असा एक चित्रपट काढावा”. तर त्यांच्या या टीकेला महाजन यांनी उत्तर दिले असून, ते म्हणाले की,”ज्यावेळी निवडणुका जवळ येतील आणि निकाल लागतील. तेव्हा हे अजून काय काय ते बोलतील आणि यांची मजल कुठपर्यंत जाईल ते काही सांगताच येत नाही.

तर महाराष्ट्रात तुमची एखादी दुसरी जागा तरी निवडून येतेय का ते बघा. तुम्ही ज्या एवढ्या मोठ्या 4-5 जणांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहात. तो  पक्ष वाढवण्यासाठी आधी प्रयत्न करा. नाहीतर तुमचाच पिक्चर बघण्याची वेळ आता लोकांवर आली आहे, असा खोचक टोला महाजनांनी ठाकरेंना लगावला. (Nashik Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here