नाशिक : नाशिक लोकसभेत उमेदवारीपासून ते आता प्रचारापर्यंत सतत रुसवे फुगवे, आरोप प्रत्यारोप आणि नाराजी नाट्य सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान, उमेदवारीवरून नाराजी नाट्य झाले असून, आता त्याचे पडसाद प्रचारातही दिसत आहेत. कारण नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांचे समर्थक हे गोडसेंच्या प्रचारात फारकाही सक्रिय सहभागी होताना दिसत नाही. त्यातच आता गोडसे आणि भुजबळांच्या फोटोवरूनही नव्याच चर्चा सुरू आहे.
आप्पांच्या कार्यक्रमात बॅनरचीच चर्चा..?
दरम्यान, हेमंत गोडसेंना महायुतीच्या मित्रपक्षांकडून फरकाही मानमोकळा पाठिंबा मिळत नसून महायुतीचे इतर पक्षांचे कार्यकर्ते किंवा स्थानिक पदाधिकारीही त्यांच्या प्रचारात ते सहभागी होताना दिसत नाही. यामुळेच आज हे नाराजी नाट्य संपवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक (Nashik Lok Sabha) दौऱ्यावर आले असून, यावेळी त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठकही घेतली. मात्र या कार्यक्रमात स्टेजवरील बॅनर चर्चेचा विषय ठरला. कारण ज्यांच्या प्रचारासाठी विजय करंजकरांनी हा घाट घातला होता. त्या हेमंत गोडसेंचा फोटो बॅनरवरून गायब होता.
Nashik Lok Sabha | संकटमोचकांची गुप्त खलबतं; तर, भुजबळ फार्मवरही मोठ्या हालचाली
Nashik Lok Sabha | आतली खदखद होती की काय..?
नाशिकच्या या मेळाव्यात काल शिंदे गटाच्या नेत्यांनी नाशिककरांसमोर मतांचा जोगवा मागितला आणि आरोप प्रत्यारोपांचा पाऊसही पाडला. यामुळे नेहमीप्रमाणे ही सभा मनोरंजक ठरली. मात्र, चर्चा बॅनरचीच याचे कारणही तसेच नुकतंच शिंदे गटात दाखल झालेल्या विजय करंजकरांनी हा मेळावा आयोजित केला होता. दोघे आप्पा आता जरी एकत्र असले तरी आधी मात्र, यांची खडाजंगी नाशिककरांनी पाहिली आहे. त्यामुळे ही आतली खदखद होती की काय..? अशा चर्चा यावेळी पाहायला मिळाल्या. (Nashik Lok Sabha)
Nashik Lok Sabha | शांतीगिरी महाराजांनी भरला शिंदे गटाकडून अर्ज..!
नाराज नाही मग प्रचार का नाही..?
दरम्यान, आता दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांचाही गोडसेंवर रुसवा असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. सध्या नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यासाठी दादा भुसे, गिरीश महाजन, स्वतः हेमंत गोडसे यांनीही प्रयत्न केले. मात्र, नाराज नसल्याचे जरी भुजबळ सांगत असले तरी ते गोडसेंच्या प्रचारात अजूनही सहभागी झालेले नाहीच.
याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी स्वतः जाणं शक्य होत नाही. त्यामुळे तिथे पदाधिकारी हे असतात. तर अजित पवारांनी याबाबत म्हटलं की, “छगन भुजबळांची तब्येत ही थोडी नरम-गरम असून, त्यांची तब्येत चांगली असल्यावरच आता या सगळ्या गोष्टी करता येतात. नाशिकच्या उमेदवारीवर डोळा ठेऊन असलेले आणि गोडसेंना डिवचत असलेले छगन भुजबळ आणि विजय करंजकर यांच्या मनात अजूनही खदखद कायम असून, आता महायुतीत एकत्र असल्याने नाईलाजाने हे दोघे गोडसेंचा प्रचार करणार का..? हे पहावे लागणार आहे. (Nashik Lok Sabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम