Nashik Lok Sabha | मध्यरात्री मुख्यमंत्री, गोडसे अन् बोरस्तेंची गुप्त बैठक; आज सस्पेन्स संपणार..?

0
35
Nashik Lok Sabha
Nashik Lok Sabha

Nashik Lok Sabha | नाशिक लोकसभा मतदार संघासाठी अजूनही महायुतीने उमेदवार जाहीर केलेला नसून, महायुतीतील तिन्ही पक्ष हे या जागेसाठी अडून आहेत. नुकतंच मंत्री छगन भुजबळ यांनी या तिकीटाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. यानंतर आता या वादात रोज काहीतरी नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. दरम्यान, अखेर आज हा तिढा सुटण्याची शक्यता असून, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गुप्त खलबतं झाली त्यात हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. (Nashik Lok Sabha)

नाशिकच्या उमेदवारीसाठी मध्यरात्री ३ वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी  या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, नाशिकचे विद्यमान खासदार हेंमत गोडसे आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या भेटीतच मुख्यमंत्र्यांनी गोडसेंना कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले होते. आता या बैठकीत पुन्हा त्याआणि गोडसे यांना काम सुरू करणेचे आदेश दिले आहेत. (Nashik Lok Sabha)

Nashik | प्रचार करायचा असेल तर खंडणी द्या; नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला धमकी

..म्हणून बोरस्तेंच्या ऐवजी गोडसेंना संधी..?

मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील. अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. मात्र शिंदे गटातच दोन गट पडले आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर पुन्हा एकडा त्यांच्याच पक्षातून आव्हान उभे राहिले. यानंतर त्यांनी अनेकवेळा मुंबई, ठाणे वारी केली. तर, दुसरीकडे शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी आपणही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते आणि यानंतर त्यांनीही ठाणे येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.(Nashik Lok Sabha)

दरम्यान, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा तिढा सोडवण्यात अखेर मुख्यमंत्र्यांना यश आले असून, आता प्रचाराला कमी दिवस शिल्लक असल्याने बोरस्ते यांच्याऐवजी गोडसेंच्या नाव फायनल झाल्याची माहिती समोर आली आहे.  कारण इतक्या कमी वेळात आता एखादा नवा उमेदवार संपूर्ण लोकसभा मतदारसंघात प्रचार करु शकत नाही. हेमंत गोडसे हे मागेले दोन टर्मपासून नाशिकचे खासदार आहेत. त्यामुळे ते मतदार संघात परिचित आहेत. तसेच त्यांच्या प्रचाराची एक फेरीही पूर्ण झाली असल्याने त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. (Nashik Lok Sabha)

Nashik Lok Sabha | तिकीटाच्या शर्यतीतून भुजबळांची माघार; मोदी, शाहांचे मानले आभार

Nashik Lok Sabha | आज उमेदवाराचे नाव जाहीर होणार..?

एकिकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन, उमेदवाराचा प्रचारही सुरू झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुती पेच कायम आहे. तिन्ही पक्ष तिकीटासाठी आग्रही असल्याने नाव जाहीर होत नव्हते. त्यामुळे छगन भुजबळ यांनी चार दिवसांपूर्वी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, मध्यरात्रीच्या बैठकीनंतर आज किंवा उद्या हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर होऊ शकते. दोन दिवसात अधिकृतरीत्या नाव जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले आहे. तर, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे. (Nashik Lok Sabha)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here