Nashik Kumbhamela | विद्यमान पालकमंत्र्यांना डावलून माजी पालकमंत्र्यांना अध्यक्षपदाचा मान

0
24
Nashik Kumbhamela
Nashik Kumbhamela

Nashik Kumbhamela | सिंहस्थ कुंभमेळा हा त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी घडणारा हिंदु धर्मींयांचा मेळा असतो यातच नाशिक शहरातील गोदावरीच्या उगमस्थानावर त्र्यंबकेश्वर येथे हा मेळा भरत असतो. मागील नाशिकमधील कुंभमोळा हा २०१५ मध्ये भरला होता. आता पुढील २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यांच्या शिखर समितीसह राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती आणि नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती जाहीर केलेल्या आहेत.
दरम्यान कुंभमेळ्यासाठीच्या या समित्यांची घोषणा करताना नगरविकास विभागाने मंत्री छगन भुजबळ यांना शिखर समितीत घेत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्षपद देण्यात आलेले आहे. २०२७ मधील सिंहस्थ कुंभ मेळयासाठी येणाऱ्या साधुसंत, लाखो भाविक तसेच पर्यटक यांच्या सोयी-सुविधा उभारण्यासह कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन आणि अंमलबजावणी ह्या जबाबादऱ्या या समित्यांकडे असणार आहेत.
नाशिक शहरातील २०२७ मधील येत्या कुंभमेळ्यासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडून शिखर समितीची घोषणा करण्यात आली असताना नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरत असून नाशिकमध्ये महापालिकेची भूमिका ही महत्त्वाची असते तर जिल्हा प्रशासनामार्फत त्र्यंबकेश्वर येथे सुविधा पुरवल्या जात असतात. या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली असून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे या समितीचे सहअध्यक्ष असणार आहेत. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यात सदस्य असणार आहेत.
२०२७ मधील नाशिक शहरात पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या काळात दळणवळण, पाणीपुरवठा, साधूसंत भाविकांना राहण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेसाठी नियोजन हे काम नेमण्यात आलेल्या समित्यांचे असणार आहे.

Nashik Kumbhamela | शिखर समितीची कामे काय? 

  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आराखड्यास मंजुरी आणि खर्चास मंजुरी देणे
  • नियोजन तसेच आराखडा अंमलबजावणीचा आढावा घेणे
  •  सर्व विभागांचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी असणार आहे.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here