Nashik | नाशिक शहर आजकाल अनेक कारणाने चर्चेत असतं. नाशकात कांदाप्रश्न, शेती किंवा गुन्हेगारी सध्या नाशिक शहर सगळीकडे चर्चेत आहे. त्यातच शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा मुद्दा थेट नागपुरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात चर्चेत आलेला आहे. भाजप आमदार नीतेश राणे यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांचा मुद्दा उपस्थित करीत सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोपदेखील करण्यात आला आहे.
हा मुद्दा आज नागपुरात पार पडत असलेल्या हिवाळी अधिवेशनात गाजल्याने याबाबत नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक याप्रकरणी काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे मात्र लक्ष लागून आहे. दरम्यान, गेल्या वर्षीही हिवाळी अधिवेशनामध्येही आमदार राणे यांनी अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांविषयी प्रश्न उपस्थित केला असता तत्कालीन पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांची बदली करण्यात येऊन उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Chagan Bhujbal | इकडे मराठे आंदोलनच करत राहिले; तिकडे भुजबळांनी साधलं ओबीसींचं हित
गेल्या सहा दिवसांपासून नागपूर येथे राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून बुधवारी (ता. १३) सकाळ सत्रामध्ये भाजप आमदार नीतेश राणे यांनी नाशिकमधील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याचे सांगतिले आहे. दरम्यान नाशिक शहरात विशिष्ट समाजाकडून रात्री-बेरात्रीपर्यंत अवैध धंदे चालविले जात असल्याचेही सांगण्यात आलं आहे.
तसेच शहरातील या अवैध धंद्यांबाबत भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधन त्यांनाही या अवैध धंद्यांची माहिती देण्यात आली मात्र त्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार राणे यांनी करत सभागृहामार्फत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Nashik | यात शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का?
नाशिकमधील भद्रकालीतील अवैध धंदा हा मुद्दा भाजप आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केलेला असला तरी, नाशिकचे स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत गप्पा का? असा सवाल आता नाशिककरांकडुन उपस्थित होत आहे. आता हा मुद्दा अधिवेशनात गाजल्यानंतर तरी स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम