राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | इगतपुरी तालुका धरणांचा तालुका व पावसाचे माहेरघर असला तरी या तालुक्याला उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. या तालुक्यातील डोंगर परिसर व दुर्गम भागात पाण्याचे स्रोत आटल्याने या ठिकाणी अनेक वाड्या-पाड्यांना मिळेल तेथून पाणी आणावे लागते. त्यात चिंचले खैरे, आवळखेड या भागात दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्या अनेक दिवसापासून या गावांना वाड्यांना टँकरची मागणी केली असली तरी अद्यापही प्रशासनाने टँकर सुरू केलेले नाहीत. याबरोबरच धरणांच्या जलसाठ्याची स्थिती खालवली असून दारणा, भाम धरणाचा जलसाठा कमालीचा घटला आहे.(Nashik)
तर भावली धरणात अवघा १३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. इगतपुरी तालुक्यात एप्रिल मे या दोन महिन्यात बहुतांश गावांना पाणी टंचाईचे दुर्भिक्ष जाणवते. अनेक वाड्या पाड्यांना दूरवरून पाणी आणावे लागते. त्यात कसारा घाट परिसरात असलेल्या आवळखेड, चिंचले खैरे या गावांना नेहमीचा पाणीटंचाईचा शाप आहे. या वाड्यांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षीही गेल्या काही दिवसापासून या वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली असून प्रशासनाने टँकर मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केले आहे. मात्र, अद्याप तरी तालुक्यात एकही टँकर सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.(Nashik)
Bhandardara | जलसंपदा विभाग झोपेतच; भंडारदरा धरणाची सुरक्षा चव्हाट्यावर
दरम्यान, या वाड्यांना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. वैतरणा धरणातून पालघर जिल्ह्याकडे पाणी नेले जाते, भावली धरणातून ठाणे जिल्ह्याकडे पाणी दिले जाते. मग या दोन चार वाड्यांना धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवली. तर या भागातील आदिवासी वाड्या पाड्यांचा पाणी प्रश्न मिटेल आणि या वाड्यापाड्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागेल. मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
याबरोबरच तालुक्याचा पूर्व भाग असलेल्या सोनोशी, मायदरा, वासाळी या टाकेद परिसरातील गावांनाही पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागातही उन्हाळ्याच्या अखेरच्या चरणात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो या भागातील काही गावांसाठी तालुक्यातील भाम धरणातून पाणी आंबेवाडी शिवारात घाट माथ्यावर घेऊन तेथून या भागातील गाव गावांना व वाड्यांना स्वतंत्र पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित आहे अद्याप योजना अपूर्ण स्थितीत आहे.(Nashik)
इगतपुरी तालुक्यातील मोठ्या धरण प्रकल्पांमध्येही गेल्या महिन्याभरात जलसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. त्यात दारणा, मुकणे, भाम या धरणाचा साठा कमालीचा घटला आहे. तर भावली धरणात जेमतेम १३ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. या १३ टक्के पाण्यात आगामी तीन महिन्यांचे नियोजन कसे करावे याची चिंता परिसरातील गावांना व शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. दरम्यान तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच अनेक गावातील महिलांना दूरवरून हंड्याने पाणी उपलब्ध करावे लागत आहे.(Nashik)
Sarvteerth Taked | शेतकऱ्यांसाठी इकर्डा आणि बायफ संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र
Nashik | इगतपुरी तालुक्यातील धरणे व धरणसाठा
दारणा : २४.८४%
मुकणे : ३१.३६%
वाकी: ४४.४६%
भाम : २४.६३%
भावली : १३.११%
कडवा : २५.८३%
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम