नाशिक – जिल्ह्यात गणरायाचे आगमन होताच पावसाचेही दमदार पुनरागमन झाले आहे. त्यातच रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील गंगापूर धरणांसह अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून प्रशासनाने स्थानिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह शहर व जिल्हा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने गंगापूर धरणातून ४ हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही धरणांतून विसर्ग करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील इतर धरणांमधून झालेला विसर्ग
दरम्यान, बुधवारी रात्री शहरासह जिल्ह्यातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत गंगापूर धरणातून ४,००० क्यूसेक, दारणा धरणातून ८,५२४ क्यूसेक, मुकणे धरणातून १,०८९ क्यूसेक तर पालखेड धरणातून २,१२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील होळकर पुलाखालून जवळपास ७,२०३ क्यूसेक इतका पाण्याचा प्रवाह गोदावरी नदीपात्रात वाहत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम