Nashik | नाशिक नगरीला साक्षात श्री प्रभू रामचंद्र यांचा सहवास आणि चरण लाभलेले आहे. श्री राम प्रभू आणि सीता माता, लक्ष्मण यांना १४ वर्ष झालेल्या वनवासात त्यांनी काही काळ हा नाशिक मध्ये घालवला असून रामायणातील काही प्रसंग नाशिक मध्ये घडल्याची अख्यायिका प्रसिद्ध आहे. दक्षिणवाहिनी गंगा गोदावरी या नदीचा उगम देखील नाशिक शहरातूनच झाला आहे. तसेच गोदावरी नदीतील रामकुंडामध्ये राजा दशरथांच्या अस्थींचे विसर्जन झाल्याची कथा असल्याने नाशिक नगरीला आणि गोदावरी नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचवटीमधील तपोवनातील सीता गूफा, राम कुंड, सीता कुंड असे अनेक प्रकारचे धार्मिक कुंड आहे.
Big Breaking | ट्रॅंकर चालकांचा संप अखेर मागे; वाहनधारकांना मोठा दिलासा
Nashik | १२ जानेवारीच्या नाशिक दौऱ्यात होणार घोषणा ?
22 जानेवारीला श्री राम मंदीरात प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सज्ज होणार असून या शुभ मुहूर्तावरच दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर नाशिकमधील गोदाघाटावर गोदा महाआरतीसाठी या मुहूर्ताची अधिकृत घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ जानेवारीच्या नाशिक दौऱ्यात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकरांची गोदा महाआरती अनुभवण्याची प्रतिक्षा आता संपणार आहे. तसेच २२ जानेवारी हा दिवस नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरणार असून सायंकाळपासून गोदा महाआरतीचे स्वर नाशकात ऐकू येण्याची आशा निर्माण झालेली आहे.
Nashik Prahar | कलावंतांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आता लढणार प्रहार!
नाशिक हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. १२ वर्षातून चार वेगवेगळ्या ठिकाणी भरणारा कुंभमेळा हा नाशिकमधील गोदावरी नदी काठी भरला जातो. त्यामुळे या पावन धरतीवर गोदामहाआरती व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यामुळे शहरातील आमदारांनी त्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला आणि ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली मात्र तरीही महाआरती प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नाही.
तसेच, १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यामध्ये गोदा महाआरतीच्या शुभारंभाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिककर येत्या १२ जानेवारीला होणाऱ्या पंतप्रधानांच्या दौऱ्याची आतुरतेने वाट पाहत असून या महाआरतीला भव्य असे स्वरूप देण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. तसेच, पुरोहित संघाने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गोदामहाआरती या प्रकल्पासाठी ४२ कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम