Nashik Viral Video: नाशिकमध्ये दोन गटांत हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

0
47

Nashik Viral video : किरकोळ कारणावरून नाशिक शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mumbai breaking: सेल्फिचा नाद जीवावर बेतला,महिला समुद्रात वाहून गेली..

नाशिकच्या पंचवटी परिसरातील हाणामारीची घटना ताजी असतानाच आता शहरातील अंबड परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

किरकोळ कारणावरून दोन गटात राडा झाला असून या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शहरातील सिडको परिसरातल्या महाकाली चौकात तरुणांच्या दोन गटांत हाणामारी झाली असून त्यात अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर आरोपींची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे.

Nashik Monsoon Update: गेल्यावर्षी गोदावरीला पूर यंदा मात्र अजूनही नाशिकला जोरदार पावसाची प्रतीक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील महाकाली चौकात मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. प्रकरण शिवीगाळ होण्यापर्यंत पोहचताच आरोपींनी एकमेकांना लाकडी दांड्याने आणि लोखंडी सळईने मारहाण करायला सुरुवात केली.

टोळक्यांनी एकमेकांना मारहाण करत परिसरातील शेकडो वाहनं फोडली आहे. त्यामुळं महाकाली चौकात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शहरात दोन गटात हाणामारी झाल्याची ही गेल्या पंधरा दिवसांतली दुसरी घटना आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नाशिकमध्ये हाणामारीच्या घटना घडत असतानाच दुसकरीकडे अहमदनगर शहरातील सावेडी परिसरातही दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. त्यात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असलेल्या अंकुश चत्तर याला गंभीर मार लागला आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here