Nashik Fire Accident | निफाडमध्ये धावत्या शिवशाही बसला आग

0
52
Nashik Fire Accident
Nashik Fire Accident

Nashik Fire Accident |  नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरीजवळील शिंपी टाकळी फाटा येथे धावत्या शिवशाही बसला अचानक आग लागली. नाशिक ते छत्रपती संभाजीनगर ह्या मार्गावर आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

ह्या भीषण बस दुर्घटनेत आग लागलेल्या शिवशाही बस मधील ३२ प्रवासी हे सुदैवाने सुखरूप असून, या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही दुर्घटना नाशिक ते छत्रपती संभाजी नगर ह्या राज्य मार्गावर शिंपीटाकळी फाटा येथे घडलेली असून, ही बस नाशिकवरुन छत्रपती संभाजी नगर कडे जात असतानाच आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ह्या धावत्या बसमधून इंजिनच्या बाजूने अचानक धूर निघत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले.

Crime news | रुग्णालयाच्या बाथरूम मध्ये सापडली मृत नवजात बालिका

दरम्यान, बसच्या वाहकाने ही बस थांबवत तातडीने ह्या बस मधील सर्व ३२ प्रवासी हे खाली उतरवले. त्यानंतर काही वेळातच ह्या बसने मोठा पेट घेतला आणि आगीचे लोट उठू लागले. दरम्यान, ह्या आगीत ही संपूर्ण बस क्षणात जाळून खत झाली. इतक्या भीषण स्वरूपाची ही आग होती. दरम्यान, ह्या भीषण घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर ह्या राज्य मार्गावरील वाहतूक ही काही काळ ठप्प झाली होती.

Jalgaon crime | पोटच्या मुलानेच निर्घुणपणे जन्मदात्याला संपविले

चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे, भाऊ कर्डिले, किरण वाघ, सुरज पगारे, सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ टर्ले हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथील स्थानिक नागरिकांनी यावेळी आग विझवण्यासाठीचे प्राथमिक प्रयत्न केले. या अपघाताच्या घटनेतील बसमधील सर्व प्रवासी हे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here