शहरातील द्वारका चौकातील झोपडपट्टीत भीषण आग; अनेक घरे जाळून खाक

0
50

नाशिक – शहरातील द्वारका परिसरात संतकबीर नगर झोपडपट्टी येथे तब्बल ५ ते ६ गॅस सिलेंडरचा लागोपाठ स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली.

शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या द्वारका परिसरातील घरे ही अत्यंत दाटीवाटीची आहे, त्यामुळे सुरुवातीला एका घरात लागलेल्या आगीनंतर ती आग आजुबाजूच्या घरांमध्ये शिरली आणि लागोपाठ त्यातूनच तब्बल ५ ते ६ गॅस सिलेंडरचा एका पाठोपाठ एक स्फोट झाला.

अत्यंत दाटीवाटीत घरे व बघ्यांची झालेली गर्दी यामुळे अग्निशमन दलाला आग विझवताना मोठ्या अडचणीना सामना करावा लागला, मात्र २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यास अखेर यश आले. या आगीत १० ते १२ घरे जळाली व यात २ ते ३ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच ह्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दल, केंद्रीय सुरक्षा दल, खाजगी उद्योग समुहाच्या तब्बल १० ते १२ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले तसेच स्थानिकांनीही आग विझवण्यासाठी शर्तींचे प्रयत्न करत होते. दरम्यान, आमदार देवयानी फरांदे यांनीही घटनास्थळी जाऊन तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here