नाशिककरांनो दिवाळीत फटाके फोडताना जरा सांभाळून; नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर

0
33

Nashik | अवघ्या काही दिवसांवरदिवाळी  येऊन ठेपली असताना सर्व नाशिककरांना दिवाळी सणाची आतुरता आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होत असते. त्यामुळे नाशकात ध्वनी आणि वायूप्रदूषणात वाढ होत असल्याने यंदा दिवाळीच्या काळात 125 डेसिबलच्या वर आवाज असणारे फटाके फोडण्यास निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत फटाके फोडण्यास बंदी असणार आहे. फटाका स्टॉल, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक रस्ता, शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांजवळ फटाके फोडण्यासदेखील निर्बंध घालण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले आहे.

धानखरेदीत भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; छगन भुजबळ यांचे निर्देश

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. सर्वच ठिकाणी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी सुरु झालेली आहे. दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणवर केली जाते. पण या दरम्यान अनेकदा अनुचित प्रकार घडतात. यावर घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फटाक्यासंदर्भात आदेश काढण्यात आलेले आहेत. त्यानुसार 125 डेसिबलच्यावर आवाज असणारे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. यातच साखळी फटाक्यांसाठी आवाजाच्या मर्यादेच्या पातळीत 5 लॉग व 10 एन डेसिबलपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. फटाका विक्रेत्यांना फुटफुटी, मल्टिमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लायमध्ये पिवळा फॉस्फरस असलेल्या फटाक्यांची आतिषबाजी बंद राहील.तयेच  लहान मुलांना फटाके विक्री करू नये आणि शांततेच्या ठिकाणी 100 मीटर दूर फटाके फोडावे अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत.

Spiritual News | ह्या महिन्यात नक्की करा ‘तुळस पुजन’ असे आहे महत्त्व…

प्रशासनाने फटाक्यांबाबत केले महत्त्वाचे आवाहन 

18 वर्षाखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय त्यांना फटाके विक्री करु नये. शांतता असलेल्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर करु येऊ नये. दरम्यान यंदा दिवाळीत नाशकात फुटफुटी किंवा तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय या नावाने ओळखले जाणाऱ्या पिवळा फॉस्फरसयुक्त असलेल्या अत्यंत विषारी असलेल्या फटाक्यांची विक्री केली जाणार नाही. मनाई केलेले आपटबार आणि उखळी दारु उडविण्यास बंदी आहे. तसेच 10 हजार फटाक्यांची माळ असलेल्या फटाके विक्री करण्यास बंदी राहणार आहे. किरकोळ विक्रेत्यांनाही हे नियम लागू असणार आहेत. नागरिकांनी फटाके गर्दीच्या ठिकाणी न उडविता मोकळ्या जागेत फोडावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केलेले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here