Nashik Crime | लग्नाचं आमिष देऊन तरुणीला जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या; तरुणीचा 3 वेळा गर्भपात

0
50

Nashik Crime | नाशिक मध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. विवाहित असूनदेखील प्रेमसंबंध निर्माण करून विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तीला जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या.

Army vehicle accident | जबलपूरजवळ सैन्य दलाच्या गाडीला भीषण अपघात

अखेर फसवणुक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने इंदिरानगर पोलिसांत संशयित संदीप सुधाकर दिघे (वय 38, रा. पाथर्डी फाटा, इंदिरानगर) याच्याविरुद्ध फिर्याद नोंदवलेली आहे दि. त्यानुसार संशयित संदीप सुधाकर दिघे याच्यावर बलात्कार तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Deola: देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष सुलभा आहेर यांचा राजीनामा

फिर्यादीनुसार, संशयित संदीप दिघे आणि तरुणीची २०२१ मध्ये ओळख झालेली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तरुणीला संशयिताने लग्नाचे आमिष दाखविलेले होते. पत्नीला सोडून देण्याचे सांगत त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते आणि त्यातून ती गर्भवती राहिली. तर फिर्यादीनुसार, संशयित संदीप सुधाकर दिघे याच्यावर बलात्कार तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here