Nashik Crime : नाशिक | नाशिकमध्ये नवविवाहित महिलेला भुतबाधा झाल्याने तिचा इलाज करण्याच्या बहाण्याने बेशुद्ध करून तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याची संतापजनक घटना नाशिक शहरातून उघडकीस आली आहे. सदर पीडित महिलेचे गेल्या 4 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र, तिला सतत पोटदुखीचा त्रास होत असल्याने तिला आरोपी कथित मौलाना बाबाकडे इलाजासाठी आणले होते. यावेळी बेशुद्ध करून तिच्यावर तब्बल तीन वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?
सदर महिला पोटदुखीने त्रस्त होती. अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले मात्र तरीही फरक न पडल्याने सासू व नंदेला जादूटोण्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी तिला वडाळा गावातील एका कथित मौलाना बाबाकडे नेले. यावेळी बाबाने तिला कोणीतरी काही खाऊ घालून करणी केल्याने भूतबाधा झाल्याचे सांगत यासाठी तिच्यावर चार दिवस इलाज करावा लागेल आणि व साडेपाच हजारांचा खर्च येईल, असे सांगितले व दोन दिवसांनी पुन्हा बोलाविले.
दोन दिवसांनंतर ही महिला नातेवाइकांसोबत १८ जुलै रोजी त्याच्याकडे गेली असता, तिच्या नातेवाईकांना बाहेर बसवून इलाजाच्या बहाण्याने तिला बंद खोलीत नेले. तिला राखेसारख्या विभूतीचे चाटण खाण्यास दिले. ज्यामुळे ती बेशुद्ध झाली असता भोंदूबाबा संशयित आमीन हुसन यासीम शेख (वय ३२) याने तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
Nashik Crime | नाशिकमध्ये गुंडांनी मिरवणूक काढलेल्या ‘बॉस’ची नाशिक पोलिसांनी काढली धिंड
राहत्या घरीही जाऊन महिलेवर बलात्कार
यानंतर पीडितेचा आजार दूर करण्यासाठी तिच्या राहत्या घरीही उतारा करवा लागेल, असे सांगत बाबा तिच्या सासरच्या राहत्या घारी आला. तेव्हाही बाबाने तिच्या घरातील सर्वांना बाहेर काढून देत बंद खोलीत पीडितेवर इलाज करण्याच्या बहाण्याने तिला बेशुद्ध केले व पुन्हा दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला.
महिला अचानक शुद्धीवर आल्याने प्रकार उघडकीस
यानंतर शुक्रवारी (दि.२६) रोजी पुन्हा पीडित महिला तिच्या पतीसोबत बाबाच्या घरी गेली असता यावेळी पतीला घराबाहेर थांबण्यास सांगत पीडितेला बंद खोलीत नेले व तिला पुन्हा ते औषध देऊन बेशुद्ध केले व बलात्कार केला. यादरम्यान ती अचानक शुद्धीवर आल्याने तिने बाबाला विरोध केला असता, याबाबत कोणाला सांगू नको. नाहीतर तुझ्या पतीसह घरच्यांना मारून टाकेल असे धमकावले. त्यामुळे पीडिता घाबरून खोलीतून बाहेर पळाली.
Nashik Crime | नाशिक हादरलं..! घरात घुसून तरुणाची हत्या; शेजारी झोपलेल्या भावालाही खबर नाही
यानंतर पीडितेने बाबाकडे जाण्यास नकार दिल्यामुळे तिच्या पतीने तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पती व सासरच्या लोकांनी मंगळवारी (दि.३०) बाबाच्या घरी जात त्याला जाब विचारला असता त्याने महिलेच्या पतीच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या बाबाला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला बुधवारी (दि.३१) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम