Nashik Crime | नाशिकच्या लखमापूर (ता. दिंडोरी) येथील शिवारात अवैध दारू विक्री करत असल्या प्रकरणी (Nashik Crime) एका संशयितास नाशिकच्या वणी येथील पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावत त्याच्यावर चौकशी केल्याचा राग आल्याने एका संशयित व्यक्तीने पोलिस ठाण्यातच चौकशी करणाऱ्या पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आली आहे.
दरम्यान, याप्रकरणी संबंधित संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखमापूर येथील फळ विहिरीच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध दारू साठा आणि अवैध दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, संशयित रविराज गजानन सोनवणे (रा. लखमापूर) याला चौकशीसाठी वणी पोलिस ठाण्यात बोलावले होते.(Nashik Crime)
चौकशीदरम्यान अंमलदार कक्षात त्या संशयिताने “माझ्यावर प्रोव्हिशन गुन्हा का दाखल करताय, यावरून कुरापत काढून वणी पोलिस ठाण्यातील हवालदार धनंजय दशरथ शिलावटे यांना संशयित रविराज सोनवणे याने शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली. ‘माझ्यावर दारुची केस केलीत, तर तुम्हाला कामाला लावतो’, अशी दमदाटीही केली तसेच हवालदार शिलावटे यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली.(Nashik Crime)
Yellamma Devi | यल्लमा देवीच्या मंदिरात पादुकांसह लाखोंचे दागिने लंपास
हवालदार शिलावटे यांनी सौम्य भाषेत संशयित रविराज सोनवणे यास समाजावून कायदेशीर कारवाई करत आहोत, असे सांगितले होते. दरम्यान, याचा रविराज सोनवणे याला राग आला आणि त्याने हवालदार शिलावटे यांची कॉलर पकडली. धक्काबुक्की करून हवालदार शिलावटे यांना खाली पाडले.(Nashik Crime)
त्यामुळे त्यांच्या कमरेस मुक्का मारदेखील लागला आहे. याबाबत हवालदार शिलावटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आपखुशीने दुखापत करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी संशयित रविराज सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोशिंबा येथे अवैध दारूची विक्री करणाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली होती. आता थेट पोलिस ठाण्यातच संशयितांकडून असे दमदाटीचे प्रकार घडू लागल्याने याबाबत नागरिकांमध्ये आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.(Nashik Crime)
Pune News | बॉसने Whatsapp ग्रुपमधून काढलं; कर्मचाऱ्याने त्याला बांबूने झोडपलं
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम