Nashik Crime | विधानसभा निवडणूकांसाठी मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची गस्त वाढली असून अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. अशातच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलरोड, सातभाई नगर येथे वाईन शॉपच्या मागच्याबाजूस एका गाळ्यात अवैध दारूसाठा आढळून आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांकडून कारवाई करत हा हा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक अशोक सातभाई व अश्विन सातभाई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
Nashik Crime | अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले!; पोलिस आयुक्तांकडून 737 व्यावसायिक तडीपार
वाईन शॉपच्या मागच्या बाजूस सापडला अवैध मद्य साठा
जेलरोड येथील ‘यो यो वाईन्स’च्या मागे अवैध मद्यसाठा असल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना मिळाली होती. माहिती मिळताच निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी ‘यो यो वाईन शॉप’च्या पाठीमागे गोल्डन नेस्ट अपार्टमेंटच्या पार्किंग समोरील गाळ्यावर छापा टाकला. यावेळी त्यांना 98 खाकी बॉक्स आढळून आले. ज्यामध्ये साडेसात लाखांचा अवैध विदेशी मद्य साठा होता. यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन कलम 65 (ई) अन्वये अशोक सातभाई व त्यांचा मुलगा अश्विन सातभाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime | तब्बल आठ वर्ष विवाहीतेचा शारीरिक व मानसिक छळ; जीवे मारण्याची धमकी देत लुटले 75 लाख
सदर पोलीसांनी केली कारवाई
तर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक प्रभाकर सोनावणे, निरीक्षक संजय फुलपगारे, सुरेश गवळी, इमरान शेख, शशिकांत पवार, विनोद लखन, सुनील गायकवाड, सौरभ लोंढे, जयंत शिंदे, पंकज करपे, गौरव गवळी, संदेश रगतवान, अनिल शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम