Nashik Crime | नाशिकच्या सिडको येथे तरुणावर हल्ला करत अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस

0
23
#image_title

Nashik Crime | नाशिक येथील अंबड-लिंक रोड भागात संजीवनीनगर येथे 18 ऑक्टोबरला रात्री 8:30 सुमारास 17 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अंबड पोलिसांनी 1 अल्पवयीनासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तर न्यायालयाकडून त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Nashik Crime | नाशकात अवैध बायोडिझेल विक्रीवर रोख लागणार; जिल्हा प्रशासनाकडून तपासणी पथके तैनात

पूर्ववैमंन्यसातून मारहाण व अपहरणाचा प्रयत्न

पोलिसांच्या माहितीनुसार, धीरज शिवशंकर वर्मा (17) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून धीरज हा विराट संकुल जवळच्या दुकानात समोसा घेण्याकरिता गेला असता तेथून घरी परतताना दुकानाजवळ संशयित आरोपी महफूज खान, साहिल चौधरी, फरहान चौधरी, मैफूज रशीद खान, सिराज खान हे 6 जण कारमध्ये होते. यांनी मागील भांडणाचा राग मनात धरत धीरजला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. शहाबाद शेख याने धीरजच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केला. तर कैफ खान याने धीरजची कॉलर पकडत त्याला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला.

Nashik Crime | पोलीस आयुक्तांच्या व्हिडिओची छेडछाड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; सायबर पोलिसांकडून शोध सुरू

याप्रकरणी पुढील तपास सुरू

यावेळी दुचाकीवरून आलेल्या कैफ मेहफूज आणि राशिद खान यांनी धीरजला शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी, आता अंबड पोलीस ठाण्यात एका अल्पवयीनासह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here