Nashik News | नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मंगळवार दि. 15 ऑक्टोबर रोजी डिस्चार्ज देताना नवजात बाळाची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर नातेवाईकांनी बाळ घेण्यास नकार देत रुग्णालयात गोंधळ घालत, या प्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली होती. यानंतर आता आरोग्य विभागाने या प्रकरणी मोठी कारवाई केली असून बाळ अदलाबदल केल्याप्रकरणी 7 डॉक्टर आणि एका परिचारिकेस तडकाफडकी निलंबित केले आहे. काल दि. 16 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल सगळीकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यानंतर अखेर आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेत कारवाई केली आहे.
नेमके काय घडले?
ऋतिका महेश पवार ही महिला प्रसूती करिता सिविल हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असता या महिलेने रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी साडे अकराच्या सुमारास बाळाला जन्म दिला. यावेळी परिचारकांनी नातेवाईकांना मुलगा झाल्याचे सांगितले. प्रसुती कक्षातील रजिस्टर वर तशी नोंद देखील करण्यात आली. त्यानंतर बाळाचे वजन कमी असल्याकारणाने त्याला नंतर एसएनसीयू कक्षात उपचाराकरिता ठेवण्यात आले. बाळाच्या पोटात पाणी असल्याने उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून देण्यात आला.
Nashik News | नाशकात ऐन पावसाळ्यात पाण्याची टंचाई; संतप्त महिलांचा महानगरपालिकेवर हंडा मोर्चा
रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार
त्यानंतर मंगळवारी रात्री आतल्या गाणी डिस्चार्ज घेण्याची तयारी सुरू केली व एसएनसीयूमध्ये बाळाचे डायपर बदलताना हातात असलेले बाळ मुलगा नव्हे, तर मुलगी असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर “आम्हाला मुलगा झाला असताना मुलगी कशी देता?” असा सवाल करीत त्यांनी उपस्थित परिचारिकांना जाब विचारला. परंतु त्यांच्याकडून “हे बाळ तुमचेच आहे.” असे सांगण्यात आले. नातेवाईकांनी हॉस्पिटल मधील नोंदी तपासण्याची मागणी केली. तेव्हा. हा ऋतिका पवार यांच्या नावापुढे मुलगा झाल्याची नोंद नमूद होती. त्यानंतर काहीतरी चुकीचे घडत असल्याचे लक्षात घेत संतप्त नातेवाईकांकडून गोंधळ घालण्यात आला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम