Nashik Crime | नंदुरबारच्या मुलीची नाशिकमध्ये प्रियकराने केली हत्या

0
44
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime |  नाशिकमधील गुन्हे हे दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे नाशिकच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना दत्त चौक, बालविद्या मंदिरच्या बाजूला मीराद्वार लॉन्सच्या पाठीमागे एक तरुणी पडलेली असल्याचा फोन पोलिसांना आला होता. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता ती तरुणी मृत असल्याचे आढळून आले. यावेळी मृतदेहावर दोरीने गळा आवळला असल्याच्या खूणा होत्या तसेच बॅगही होती.(Nashik Crime)

या बॅगमध्ये सापडलेल्या कागदपत्र आणि आधारकार्डच्या सहाय्याने अवघ्या काही तासांतच मृत तरुणीची ओळख पटवली आणि तिच्या मारेकऱ्यालाही ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे या तरुणीचा मारेकरी हा दूसरा तिसरा कोणी नसून, तिचाच प्रियकर आहे. तरुणी सतत तिच्या इतर मित्रांसोबत बोलत असल्यामुळे तिच्यावर संशय घेत त्याने हत्या केल्याची त्याने कबुली दिली.

Nashik News | नाशिकमधील शाळेत शिक्षकाचे विद्यार्थीनींसोबत अश्लील चाळे

या घटनेत मृत तरुणीचे नाव हे प्रियंका वसावे असे असून, ती मुळची नंदुरबार येथील आहे. सध्या शिक्षणासाठी ती नाशिकमध्ये वास्तव्यास होती. ही तरुणी नंदुरबार येथून नाशिकमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेण्यासाठी आली होती. हे दोघेही एकाच गावचे असून, संशयित आरोपी सागर तडवी हा अंबडमध्ये एका खासगी कंपनीत कामाला असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Nashik Crime | नेमकं प्रकरण काय..?

प्रियंका ही सोमवार रोजी संध्याकाळी ५.३० वाजता अंबड येथे आरोपी सागरच्या रूमवर गेली होती. येथे ती इतर मुलांसोबत बोलते यामुळे सागरचा तिच्यावर संशय होता. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. रात्री दीड वाजेपर्यंत त्यांच्यात जोरदार भांडणं सुरू होती. दरम्यान, यामुळे राग अनावर झाल्याने आरोपी प्रियकर सागरने त्याची प्रेयसी प्रियंका हिचा ओढणीने गळा आवळला. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन

त्यानंतर आरोपीने तिच्या मृतदेहाची कशी विल्हेवाट लावायची याचा प्लॅन तयार केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याच्या मित्राची मदत घेतली. मित्राच्या दुचाकीवरून या दोघांनी तरुणीचा मृतदेह नेऊन पंचवटी येथे निर्जनस्थळी टाकून दिल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली आहे. (Nashik Crime)

Nashik | नाशिकमध्ये पुन्हा ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट

पोलिसांची कारवाई

मृत तरुणीचा मोबाइल तपासात असताना, पोलिसांना एका नंबरवर संशय आला. त्यांनी त्या नंबरवर कॉल करत त्या नंबरधारकाला फोनवर बोलण्यात व्यस्त ठेवले आणि मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करत ते आरोपीपर्यंत पोहोचले. ताब्यात घेतल्यानंतरही त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा मोबाइल तपासला असता, त्यातून त्याच्या घटनेत सहभागी असलेल्या मित्राला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. संबंधित मित्राने कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सागरनेही हत्येची कबुली दिली.(Nashik Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here