Nashik Crime | नाशकात दारूवरून फटकारल्याने भाच्याने मामाचा केला खून

0
24
Nashik
Nashik

Nashik Crime |   नाशिकमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून, किरकोळ वादातून होणाऱ्या खूनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, अशीच  एक घटना नाशिकमध्ये घडली असून, मामाला भाच्यानेच संपवल्याचा  प्रकार उघडकिस आला आहे.

दरम्यान, “मुलाला दवाखान्यात नेण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाही, अन् तुझ्याकडे दारु प्यायला पैसे आहे?’ अशा शब्दता मामाने भाच्याला फटकारल्याने रागाच्या भरात भाच्याने स्वतःच्या मामाचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील पंचवटी ह्या परिसरातील हा प्रकार असून, ह्या प्रकरणात आरोपी असलेल्या भाच्याचे नाव मच्छिंद्र मानभाव असे असून, खून झालेल्या मामाचे नव हे बाबुलाल सोमा गावित (वय -७४ रा. पिंपळनेर, जि. धुळे) असे आहे. दरम्यान, नाशिक पोलिस हे या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत.

 Chh. Sambhaji Nagar | दारुच्या नशेत वृद्ध महिलेवर अतिप्रसंग करत हत्या

मृत मामा बाबुलाल सोमा गावित हे मागील दोन महिन्यांपासून नाशिक शहरातील पंचवटीमधील हिरावाडी ह्या परिसरात आपला भाचा मच्छिंद्र मानभाव याकडे राहत होता. दरम्यान, गेल्या शुक्रवारी दुपारच्या सुमारास “तुझ्या मुलाच्या पायाला चटके लागले असून, त्याला दवाखान्यात न्यायला तुझ्याकडे पैसे नाही.

आणि दारू प्यायला पैसे आहे” अशा शब्दांत मामाने भाचा मच्छिंद्र याला राग आला आणि त्याच रागाच्या भरात आरोपी भाचा मच्छिंद्र याने राहत्या घरातच पलंगावर बसलेल्या आपल्या मामाला जमिनीवर ओढले आणि तसेच तिथेच झाडाची प्लास्टिकची कुंडी त्यांना मारुन फेकली. दरम्यान, या घटनेत जखमी मामाचा तिथेच मृत्यू झाला आहे.

Nagpur Crime | प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून प्रियकराने एक्स गर्लफ्रेण्डला संपवलं

मृतदेह घरातच पडून 

या प्रकरणी, आरोपी भाचा मच्छिंद्र याने आपल्या मामाचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह हा शुक्रवार रोजी संपूर्ण दिवसभर घरातच ठेवलेला होता. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठीही कोणी पुढे येत नव्हते. अखेर शनिवारी पोलिसांनीच नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मृतदेह दाखल केला आणि रविवार रोजी मयत व्यक्तीचा शव विच्छेदन अहवाल हा प्राप्त झाला.

दरम्यान, त्यानंतर पंचवटी पोलिसांनी आरोपी असलेला भाचा मच्छिंद्र मानभाव याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच पंचवटी पॉइल्स हे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. बाबुलाल सोमा गावित यांना नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे येथे शव विच्छेदन झाले. पोटात मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here