नाशिक : राज्यात सत्तांतर नंतर बदल्यांचा धडाका सुरूच असून जो तो पालकमंत्री आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून यात नाशिक शहराचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी दबंग अधिकारी देण्यात आले आहेत.
नाशिक शहराची धुरा आता अंकुश शिंदे यांच्या खांद्यावर असून नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. अंकुश शिंदे हे याआधी पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त होते. त्यांच्या दबंग कामगिरीने भल्याभल्यांची तारांबळ उडाली होती. तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जयंत नाईकनवरे हे सुरवातीपासूनच मीडिया पासून अलिप्त होते त्यांनी नाशिकसह सातारा, वर्धा, पुणे, मुंबई जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली असून त्यांच्या कार्यकाळात शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी विशेष उपक्रम राबविले आहेत. विशेष छाप मात्र त्यांना पाडता आलेली नाही.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम