Nashik Corona Alert | २९ जानेवारी २०२० रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला होता त्यानंतर मात्र फक्त भारतालाच नाही तर संपुर्ण जगभराला एका व्हायरसने अक्षरशः हादरवून टाकले होते. या व्हायरसमुळे देशातील आरोग्य यंत्रणेची चांगलीच परीक्षा घेतली. या काळात कितीतरी लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. यातच गेल्या दीड वर्षापासून कुठेतरी देशातील लोक सावरत असताना तब्बल दीड वर्षानंतर करोनाने पुन्हा एकदा देशात पुनरागमन केले आहे.
देशातील सर्वात मोठा कसोटीचा काळ म्हणजे कोरोना काळ. या काळात देशातील कितीतरी गोष्टी अचानक ठप्प झाल्या होत्या यातच आता केरळमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असून यामुळे भारतातील आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर आली असून यातच नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आरोग्य तसेच वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेऊन यंत्रणेला सजग राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Nashik Crime | नाशकात दारूवरून फटकारल्याने भाच्याने मामाचा केला खून
२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला आणि एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत नाशिक शहरात कोरोनाने थैमान घातले होते. नाशिक शहरात चार लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली होती तसेच चार हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. आता पुन्हा एकदा भरतात कोरोनाची चाहूल लागताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला असून महामगरपालिकेला यासंदर्भातील दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने अलर्ट जारी केल्यानंतर नाशिक महापालिकेचे आयुक्त करंजकर यांनी आरोग्य वैद्यकीय विभागाची तातडीची बैठक घेऊन कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड, ऑक्सिजन व्यवस्था तसेच औषधसाठ्याचा आढावा घेत सर्व विभागांना सज्जतेचे आदेश दिले असून आता यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
Deola News | राज्य सहकारी बँकेकडून वसाकाची मालमत्ता जप्त; कामगारांमध्ये तीव्र नाराजी
Nashik Corona Alert | करोनाचा रुग्ण नाही
सध्या देशात कोरोनाचे रुग्ण आढळत असून अद्याप नाशिक शहरात करोनाचे रुग्ण आढळलेले नसले तरीही नागरिकांनी कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या लक्षणांच्या बाबतीत दुर्लक्ष करू नये. सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे यांसारखी लक्षणे आढळलीत तर ताबडतोब संबंधितांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन महानगरलिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम