नाशिक, प्रतिनिधी – शहरात संपूर्ण आठवडाभर झालेल्या अतिवृष्टीनंतर काल रविवारी पावसाने पाठ फिरवली. पुढचे चार दिवस पाऊस न पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला. मात्र, त्यांचा अंदाज फोल ठरवत आज पावसाने जोरदार हजेरी लावली.
काल दिवसभर शहरात सूर्यदर्शन झाल्यानंतर आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. काहीकाळ तर जोरदार पाऊस पडल्यानंतर इतरवेळी मात्र पावसाच्या हलक्या सरी वाहत आहेत. शहरात आतापर्यंत ४ मिमी पावसाची नोंद झाली असून रात्रीपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहरातील पंचवटी, अशोकस्तंभ आदि भागात मध्यम सरीचा पाऊस पडला आहे. तर शालिमार, द्वारका, सीबीएस इथे हलक्या सरीचा पाऊस पडत आहे. शहरात बहुतांश भागात मध्येच ब्रेक घेत थोडा पाऊस झाला आहे. पण, रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम