नाशिक प्रतिनिधी – नाशिक शहरात सातत्याने सुरू असलेली आंदोलने, त्यामुळे झालेली परिस्थिती आणि येणाऱ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने आज मध्यरात्रीपासून २७ जूलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू केली आहेत.
महाराष्ट्र पोलिस कायदा, १९५१, कलम ३७-१-३ च्या कलमाद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशात कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे बरोबर नेणे वा ते जवळ बाळगणे, प्रतिकात्मक दहन करणे, अर्वाच्य घोषणा देणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन महाआरती करणे, सभा-मिरवणुका आदी प्रकारांने शांतता भंग होणाऱ्या सर्व प्रकारांना मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तालयाद्वारे देण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम