नाशिक बस अपघात : जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जाहीर

0
40

Nashik Bus Fire : आज पहाटे नांदूर नाकाजवळील मिरची हॉटेल भागात एका खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू, तर ३० हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून या अपघातातील मृत व जखमींची माहिती संबंधिताना पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन शाखा व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सदर नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

नियंत्रण कक्ष क्रमांक – जिल्हा रुग्णालय, नाशिक :

+912532572038, +912532576106

राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त 

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिक येथील अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रती शोक-संवेदना व्यक्त करत अपघातातील जखमींना लवकर बरे होण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व इतर अनेक नेत्यांनी या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे.

डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवणार : जिल्हाधिकारी 

यावेळी जिल्हाधिकारी गंगाधरन बी. यांनी जिल्हा रुग्णालयात भेट घेत एकूण घटनेची अधिक माहिती घेतली. यावेळी ते माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलिसांकडून या अपघाताची चौकशी सुरु आहे. सध्या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून मृत पावलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी त्यांची डीएनए चाचणी केली जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here