Nashik Breaking | नाशकात बडगुजर यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक

0
43
Nashik Breaking
Nashik Breaking

Nashik Breaking | आज नागपूर मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजप नेते नितेश राणे, आशिष शेलार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिकचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्याबाबत एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. नितेश राणे यांनी विधानसभेत थेट फोटो दाखवत सुधाकर बडगुजर यांचे दहशतवादयांसोबत घनिष्ट संबंध असल्याचा आरोप केला आहे.

Nashik Breaking | बजगुजर विरोधात नाशकात निषेध आंदोलन

उबाठा नाशिकचे सुधाकर बडगुजर यांचे देशद्रोही यांच्या सोबतचे पार्टी करतानाचे व नचतांचे फोटो, व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यातच आता बजगुजर यांच्या निषेधार्थ आज दुपारी 2 वाजता शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर जिल्हा, मायको सर्कल येथे आंदोलन करण्यात येणार आहे. नाशिककरांना या आंदोलनात उपस्थित राहण्याचं आवाहनही नाशिक शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे.

आंदोलनाचं स्थळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर – जिल्हा

बडगुजर यांची नाशिकमध्ये दुपारी २:30 वाजता पत्रकार परिषद

बडगुजर यांनी नाशिकमध्ये दुपारी २:30 वाजता पत्रकार परिषद बोलावलेली असून सुधाकर बडगुजर हे माध्यमासमोर त्यांची भूमिका मांडणार आहेत. यावेळी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर सुधाकर बडगुजर काय प्रत्युत्तर देता हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे. बडगुजर यांच्यावर भाजपा नेते नितेश राणे, आशिष शेलार आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आजच्या अधिवेशनात आरोप केकेले आहेत यावर आता बडगुजर आपली काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

नेमकं प्रकरण काय ..? 

नाशिकचे उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर हे १९९३ च्या बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता सोबत एका पार्टी मध्ये नाचतानाचा एक कथित व्हिडिओ आणि काही फोटो हे आज भाजप आमदार नितेश राणे यांनी अधिवेशनात दाखवले आहेत. यावरून बडगुजर हे आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत काय करत होते? आणि यांचा एकमोकांशी नेमका काय संबंध? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. याबाबतचे फोटो दाखवत आमदार नितेश राणेंनी विधानसभेत ठाकरे गटाला जाब विचारला आहे.

Breaking | ठाकरे सेनेचा बुरखा फाटला; मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ‘कुत्ता’ सोबत बडगुजरांची पार्टी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here