अशोकस्तंभ चौकाचे रुपडे आता पालटणार; सुशोभिकरणाच्या कामाला वेग

0
38

नाशिक प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नाशिक महानगरपालिकेकडून शहरात विविध उपक्रम राबविले जात आहे. याच अंतर्गत महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सीएसआर निधीद्वारे शहरातील अशोकस्तंभ चौकाचेही सुशोभिकरण सुरू करण्यात आले असून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साध या चौकाला एक नवे रूप मिळणार आहे.

सीएसआर निधीतून हे काम केले जात आहे. यामुळे अशोकस्तंभ चौकाचे रुपडे पालटणार आणि नाशिक शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. नाशिकमधील दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी पुढाकार घेत मदत केली आहे. यासाठी दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सतर्फे सुमारे १५ लाख खर्चून ह्या चौकाचे सुशोभिकरण सुरू असून पुढील १० वर्षांसाठी त्यांनी अशोकस्तंभाच्या देखभाल आणि दुरुस्तीचीही जबाबदारीदेखील स्विकारली आहे. या कामाचे डिझाईन आर्किटेक्ट विशाल घोटेकर यांनी केले आहे. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव या कल्पनेवर चौकाचे सुशोभिकरण साकारण्यात येत आहे. विशेष म्हणजे येत्या १५ ऑगस्टपूर्वी संपूर्ण काम पूर्ण करण्यात येणार आहे, त्यामुळे आतापर्यंत ह्या कामाला वेग मिळत असून रंगरंगोटी व फरश्या बसवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here