Nashik 12th exam: विद्यार्थ्यांची परीक्षा, कर्मचाऱ्यांचे आंदोलन;74 हजार 780 विद्यार्थी देताय परीक्षा

0
19

Nashik 12th exam ; विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील टप्पा म्हणजे बारावी हा असतो. यानंतर मोठ्या प्रमाणात आयुष्याला कलाटणी मिळत असते, मात्र हा टप्पा सर्वच विद्यार्थ्यांना आवडेल असा नाही, अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते. आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा सुरू झाली असून नाशिक (Nashik) जिल्ह्यात जवळपास 108 केंद्रावर 74 हजार 780 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मात्र दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संधि साधत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून ते अद्यापही सुरूच असल्याने जिल्हाभरात जवळपास 800 हून अधिक कर्मचारी संपावर गेल्याने बारावीची परीक्षा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कारण संपूर्ण तान हा इतर यंत्रणेवर येत असल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

Morning Tea: तुम्हीही सकाळी रिकाम्या पोटी चहा पिताय तर थांबा ! आरोग्यावर होताय परीणाम

आज पासून नाशिक जिल्ह्यात बारावीच्या परीक्षांना (12th Exam) सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 108 केंद्र असून 74 हजार 780 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत  आहेत. कॉपी मुक्त अभियान राबविताना आठ  भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे, महिला पथकांचा देखील समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जुनी पेन्शन (Old Pension) योजना लागू करण्यासह प्रमुख सहा मागण्यांसाठी अकृषी विद्यापीठातील अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याचा फटका विद्यार्थ्याना बसतो कि काय अशी शंका उपस्थित हॉट आहे.  या संपामुळे आज सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेत अडचण निर्माण झाली आहे. प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या काळात निदर्शने सुरू झाल्याने अडचण वाढली आहे.

विद्यार्थ्याना परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत. सकाळ सत्रात साडेदहा तर दुपार सत्रात अडीच वाजता परीक्षा स्थळी  उपस्थित राहणे आवश्यक असून कॉपीमुक्त वातावरण परीक्षा पार पाडावी यासाठी निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळातर्फे आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या  परीक्षा 21 मार्च पर्यंत  पार पडणार आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागात जवळपास एक लाख 62 हजार 612 विद्यार्थी असणार आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन डोकेदुखी

आंदोलन म्हटले कि ते डोकेदुखी ठरत असते मात्र आजचे आंदोलन हे अडवणूक असल्याची चर्चा महाविद्यालयाच्या परिसरात सुरू होती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापूर्वी सुरू केलेल्या परीक्षा कामकाजावरील बहिष्कारमुळे आधीच राज्यातील विद्यापीठीय परीक्षांचा खोळंबा झाला असून आता बारावीच्या परीक्षेतही अडचण येणार असल्याने कर्मचाऱ्यांचे हे आडमुठे धोरण आहे कि लोकशाही मार्ग हा संशोधनाचा भाग आहे. या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांसह शिक्षकांवर आता गठ्ठे बांधणे, परिक्षार्थींचे आसन क्रमांक टाकणे, प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका गठ्ठे जुळवणे, लिहिलेल्या पेपर गठ्ठे आणि बॉक्समध्ये भरून स्ट्रॉंग रूममध्ये ठेवणे, हे कामे शिक्षकांनाच करावे लागत असल्याने परीक्षा सुपरव्हिजनसह नियोजन कामातही अडचणी वाढल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास बारावीच्या परीक्षांवर आम्ही बहिष्कार टाकू, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील असा ईशारा नाशिकमधील आंदोलनकर्त्या शिक्षकेतर संघटनांनी दिला आहे. यामुळे प्रशासन काय तोडगा काढते याकडे यांकडे  राज्याचे लक्ष लागले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here