देवळा | सोमनाथ जगताप
वांजुळपाणी संघर्ष समितीतर्फे आ.डॉ राहुल आहेर यांची भेट घेऊन नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प बाबत शासन स्तरावर सुरू असलेल्या कारवाई बाबत चर्चा केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात आ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडून पश्चिम वाहिनी नार पार अंबिका औरंगा ताण माण नद्यांचे पाणी पूर्ववाहिनी करून तुटीच्या गिरणा खोऱ्यात वळविण्याबाबत मागणी केली होती . त्याबद्दल वांजुळपाणी संघर्ष समितीने आ राहुल आहेर यांचे अभिनंदन केले.
विषय संपला! उद्धव ठाकरेंना नाशकात सचिन अहिरेंची साथ; उसळनकर्ते सोशल मीडियावर ॲक्टिव्ह
वांजूळपाणी संघर्ष समितीच्या वतीने प्रवाही वळण योजनेद्वारे नारपार खोऱ्यातील पाणी गिरणा खोऱ्यात वळविण्यात यावे तसेच नार पार गिरणा नदी जोड प्रकल्पात वांजुळपाणी योजनेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी आ. डॉ राहुल आहेर यांच्याकडे करण्यात आली, यावर नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पात प्रवाही वळण योजनेचा समावेश करण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कळवण सटाणा देवळा मालेगाव नांदगाव चांदवड सह संपूर्ण खानदेशला सुजलाम सुफलाम करण्यासाठी नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्प मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून तातडीचे पावले उचलली जात आहे अशी माहिती दिली.
यावेळी प्रा. के एन आहिरे, प्रा. अनिल निकम, निखिल पवार, देवा पाटील, उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे , कुबेर जाधव उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम