Narhari Zhirwal | राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांना राजकारण तापलं असून आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणखी एक वाद उफाळून आला आहे. धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी आता विरोध दर्शवला आहे. धनगर समाजाला आमच्यात आरक्षण येऊ देऊ नये. अशी भूमिका घेत त्यांनी “टाटा इन्स्टिट्यूटने जो अहवाल तयार केला आहे. तो सरकार का प्रसिद्ध करीत नाही आणि इतर कमिटी नेमून त्यात काय करणार?” असा सवाल उपस्थित केला आहे.
Narhari Zhirwal | धनगर आरक्षावरुन महायुतीत वाद?; नरहरी झिरवळ सरकारविरोधी भूमिकेत
नेमके काय म्हणाले नरहरी झिरवळ ?
धनगर समाजातर्फे, “आम्ही आदिवासी आहोत. आम्हाला आदिवासी समाजातूनच आरक्षण द्या. धनगर आणि धनगड असा शब्दांचा अपभ्रंश केला जातो. त्या माध्यमातून आम्हाला आदिवासींमध्ये घेतलं पाहिजे.” अशी मागणी करण्यात येत आहे. सपण ते आमच्यातले नाहीत. असे आमचे मत आहे.” अशी भूमिका नरहरी झिरवळ यांनी मांडली. “धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका.” असेही त्यांनी यात नमूद केले आहे. यांच्या या विरोधामुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
“सरकारने ‘पेसा’ भरती कायदा लागू केला पाहिजे. या प्रकरणात आता सरकार स्वतः कोर्टात गेले आहे. त्यामुळे आमच्यामध्ये आणि आदिवासी मुलांमध्ये संभ्रमावस्या निर्माण झाली आहे. त्यात या प्रकरणातील सुनावणी देखील होत नाहीये, मग ‘पेसा’ कायदा लागू न करता या मुलांची भरती करावी. या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत” असे त्यांनी सांगितले.
Narhari Zirwal | ‘अजितदादा म्हणजे फणस’ कौतुकसुमने उधळत झिरवाळांनी दादांसमोर मुलाची बाजू झाकली..?
“…तर मुंबईचा पाणी बंद करू”- किरण लहामटे
अजित पवार गटाचे नेते किरण लहामटे यांनी यापूर्वी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडली होती. “धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही मुंबईचे पाणी बंद करू असा थेट इशारा त्यावेळी दिला होता. जर धनगरांसाठीचा जीआर काढला आणि शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात पाऊल उचललं तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील आमदार आणि खासदार आक्रमक पवित्रा घेऊ.” असे देखील त्यांनी सांगितले होते. तर “आत्तापर्यंत आदिवासींनी एवढा त्याग केला आहे. जर तुम्ही आमच्या बोकांडी बसाल तर आम्ही मुंबईचा पाणी बंद करू, तिथे जोडणारे जे रस्त्यांवर रोखू, रेल्वेची रूळं उखडून टाकू.” अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी काही दिवसांपूर्वी सरकारला इशारा दिला होता.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम