Nandurbar : नंदुरबार पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मद्यासाठा जप्त….

0
40

Nandurbar – धुळे-नंदुरबार परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने मद्य वाहतूक केल्या जात असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक कारवाई शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नंदुरबार पोलिसांकडून करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातून मध्यप्रदेश, हरियाणा व गोवा राज्यातील मद्याची तस्करी होत असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलिसांना मिळताच त्यांनी उमर्दे गावाजवळ सापळा रचत करावाइ केली आहे.

 

यावेळी पोलिसांना एक बलेरो वाहन संशयास्पद आढळून आल्याने त्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, यावेळी भांबावलेल्या वाहन चालकाने पोबरा करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले आणि वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यातून मॅक डॉनल्स कंपनीच्या विदेशी मद्याचे 40 बॉक्स जप्त केले असल्याच पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान तीन लाख रुपयांचे विदेशी मध्य तसेच पन्नास हजार रुपयांची रोकड व वाहन असा एकूण सहा लाख 72 हजार 780 रुपये किमतीचा मुद्देमाल या जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच धुळे शहर पोलिसांनी देखील लाखोंचा मध्य साठा जप्त केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर मध्यसाठा जिल्ह्यात येतोच कसा? ठीक ठिकाणी पोलिसांकडून वाहन तपासणी केली जात असताना मद्यसाठा जिल्ह्यात पोहोचत असल्याने जिल्हाभरात विविध चर्चांना उधाण आल आहे. दरम्यान या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

मात्र वारंवार घडणाऱ्या या घटनांकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त केले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here