‘India’ नाही ‘भारत’! NCERT च्या पुस्तकात देशाचे नाव बदलणार

0
12

NCERT | अनेक दिवसांपासून देशाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. जागतिक मंचावर भारताची ओळख ‘India’ अशी आहे. तर काही देश भारताला ‘हिंदुस्थान’ या नावानं ओळखतात. G-20 परिषदेवेळी भारताच्या राष्ट्रपतींनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर President of India ऐवजी President of Bharat असे लिहिलेले होते. त्यावरुनच गदारोळ झाला. देशातील जनतेने केंद्र सरकारचे कौतुक केले आहे.  NCERT च्या पुस्तकात हा बदल दिसणार आहे. ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ या शब्दाचा प्रयोग करण्यात येईल.  देशाचे नाव आता पाठ्यपुस्तकात India ऐवजी Bharat असे लिहिलं जाणार आहे.

कोणत्या इयत्तेपासून बदल ? 

‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ असा बदल करण्यास NCERT च्या पॅनलने मंजूरी दिलेली आहे. एनसीईआरटीच्या इयत्ता 12 वीच्या पाठ्यपुस्तकात हा बदल करण्यात येणार आहे. नवीन पाठ्यपुस्तकात देशाचे नाव भारत ठेवण्याविषयीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. त्याला मंजूरी देण्यात आल्याची माहिती पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक सी. आय. इसाक (CI Issac) यांनी दिली आहे. या पुस्तक समितीने देशाचा प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकण्याची शिफारस सुद्धा केलेली आहे.

धक्कादायक! २१ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी मृत्यूला कवटाळलं

इतिहासाच्या पुस्तकातदेखील बदल

NCERT समितीने पाठ्यक्रमात हिंदू विजयावर प्रकाश टाकण्याची शिफारस केलेली आहे. प्राचीन इतिहासाऐवजी शास्त्रीय इतिहासाचा समावेश करण्याची शिफारस त्यासाठी करण्यात आलेली आहे. 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्यानुसार, हा बदल करण्यात येते आहे. त्यात यापूर्वी पाठ्यपुस्तकात समावेश न केलेल्या ऐतिहासिक इतिहासाचा समावेश करण्यात येणार आहे.

कधी झाला होता बदल ?

एप्रिल महिन्यात NCERT ने इयत्ता 10वी, 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमात बदल केलेला होता. या पुस्तकात अनेक धडे हटवण्यात आलेले होते. नवीन पाठ, धडे जोडण्यात आलेले आहेत. या बदलांना अर्थातच विरोध होतो आहे. विज्ञानाच्या पुस्तकातून अनेक धडे हटवण्यात आले आहे. अनेक वैज्ञानिक, विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षकांनी CBSE च्या इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील या बदलांवर नाराजी जाहीर केली जात आहे.

Onion Rate | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कांद्याला 6 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळणार

राष्ट्रपती यांनी केली सुरुवात

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी G-20 पाहुण्यांसाठी रात्रीच्या जेवणाचे आमंत्रण पाठवलेले होते. त्यात President of India ऐवजी President of India असा उल्लेख करण्यात आलेला होता. 2020 पासून देशातील नावात बदल होत असल्याची चर्चा सुरु आहे. पण सध्याच्या काही बदलांमुळे या चर्चांना हवा मिळालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच मुद्यांवर विरोधकांची विकेट काढली आहे. सप्टेंबर महिन्यात त्यांनी ‘भारत’ अशी लिहिलेली पाटी समोर ठेवलेली होती. दिल्लीतील प्रगती मैदानावर भारत मंडपमध्ये G-20 लीडर्स शिखर सम्मेलन हाच प्रयोग करण्यात आलेला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here