धक्कादायक! २१ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी मृत्यूला कवटाळलं

0
2

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीडमधील शहाजानपूर लोणी गावात एका 21 वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. ‘अशोक मते’ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या का करत आहोत, याचे कारण त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितलेलं आहे.  राज्यात आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजत आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेले आहे. सरकारही मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक असून कोणी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. तरीदेखील तरूण आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत.

Onion Rate | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! कांद्याला 6 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा भाव मिळणार

अशोक मते या तरुणाने स्वतःच्या शेतात आपली जीवनयात्रा संपवलेली आहे. या घटनेची माहिती मिळली तेव्हाच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली उतरवला त्यानंतर त्यांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर या चिठ्ठीत लिहिला होता. याविषयीची माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे. मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

Fake Medicine | बनावट औषधं घेताय..तर सावधान! औषध विक्रेत्यांना निर्देश

जालन्यात आरक्षणासाठी दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना तालुक्यातील पाहेगाव येथे मागच्या 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. राज्य सरकारने 40 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे आक्रमक होत आंदोलन करणाऱ्यांतील दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यामधील चिकनगाव मधील एका व्यक्तीने मुंबईत आरक्षणासाठी आत्महत्या केलेली होती. वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती. सुनील बाबुराव कावळे असं या व्यक्तीचं नाव होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here