Nagpur Crime | प्रेम आंधळं असतं असं म्हणतात ते उगीच नाही. याची प्रचिती घडवणाऱ्या अनेक घटना आजतागायत महाराष्ट्रभरात घडलेल्या आहे मात्र याच प्रेमसंबंधातून अनेक गुन्हेही घडतात. यातच एक नविन घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून जुन्या प्रेयसीची हत्या करण्यात आली असून या आरेपीला शिक्षा सूनावण्यात आली आहे.
Jalna Crime | एका घरामुळे पोटच्या मुलाने बापाला मारहाण करीत संपवले
नेमकं प्रकरण काय?
नागपुरमध्ये ही संपुर्ण घटना घडली असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र हा सगळा प्रकार नेमका घडला कसा? या प्रकरणातील मृत मुलगी ही लक्ष्मीनगर येथे आपल्या मामाच्या घरी राहत असून ती प्रतापनगरमधील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तीथे तीची एका मुलाशी ओळख झाली पुढे या दोघांचे प्रेमसंबंध झाले मात्र त्यांच्यात वाद झाल्याने त्यांचं ब्रेकअप झाले. परंतू, ही बाब आरोपी मुलाला मान्य नव्हती म्हणून त्याने मुलीला आपल्याशी प्रेमसंबंध कायम ठेवण्यासाठी बळजबरी देखील केली. परिणामी आरोपी मुलगा हा चिडून त्या मुलीला शिवीगाळ करू लागला तसेच धमक्याही देऊ लागला होता.
मात्र शेवटी मुलगी फार वैतागली असताना तीने त्याच्या या स्वभावाला कंटाळून आरोपी मुलाशी संपर्क तोडला मात्र प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून त्या मुलाने प्रेयसीची हत्या केली. आता सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. कणकदंडे यांनी या आरोपी मुलाला जन्मठेप तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून रोहित मनोहर हेमनानी उर्फ भोलानी (वय २५) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.
Pune Crime | आधी लग्नाचे ‘प्रॉमिस’ आणि नंतर डांबून ठेवत मारहाण अन् अत्याचार
Nagpur Crime | कसा घडला हा गुन्हा ?
मुलगी मामाकडे वास्तव्यास असल्याने आरोपी रोहित घटना घडली त्या दिवशी मुलीच्या मामाकडे तीला भेटण्यासाठी गेला असता तरुणीच्या मामीला त्याने दोन ते तीन मिनीटे भेटू देण्याची विनंती केली पण मामीने त्या मुलाला भेटण्यासाठी नकार दिला. त्यानंतर मात्र रोहितची ही शेवटची भेट म्हणून मामा आणि मामीने मुलीला भेटण्याची परवानगी दिली आणि तरुणीला बोलावले. मात्र जे घडायला नको होतं तेच घडलं कट्यारीसह तयारीत आलेल्या रोहितने बोलणं झालं आणि परतणाऱ्या मुलीचा हात पकडला अन् भररस्त्यात कट्यार खुपसून मुलीचा खून केला. जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या मुलीच्या वाढदिवशीच आरोपी रोहितला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम