नाबार्ड-बायफ अंतर्गत टाकेद परिसरात होणार श्रमदानातून पाणलोट क्षेत्राचा विकास ; घोडेवाडी येथे बैठक संपन्न

0
10

राम शिंदे
इगतपुरी : आज मंगळवार ता.१५ रोजी सकाळी घोडेवाडी येथील विठ्ठल मंदिरात नाबार्ड अंतर्गत बायफ च्या अधिकारी वर्गाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत टाकेद व परिसरात कडवा kaching परिसरात नवीन cct , के टि बंधारे, gabring वॉल बंधारे, श्रमदानातून बनविल्या जाणार आहे यामुळे पळणारे वाहणारे पाणी हे अडविल्या जाणार असून यासोबत वाहत्या पाण्या बरोबर वाहून जाणारी उत्तम माती देखील अडविल्या जाणार आहे यामुळे मातीची धूप पण थांबणार आहे.

अडविलेले पाणी पण जमिनीत जिरवले जाणार आहे यामुळे टाकेद व परिसरातील डोंगर उतारपासून ते कडवा नदी पर्यंत परिसरातील पाण्याची पातळी वाढणार असून याचा थेट फायदा हा स्थानिक शेतकरी वर्गाला होणार आहे. या उपक्रमामुळे जमिनीतील पाणी क्षमता उंचवणार असून या परिसरातील विहीर, सिंचन, शेत पंप यांची पाण्याची पातळी वाढणार असून उन्हाळ्यात महिला माता बघिणीसह पाळीव जनावरे गुरे वासरे यांची पाणी टंचाईची समस्या दूर होणार आहे.

यासोबत या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींना perculation ने पाणी उपलब्ध होणार आहे.यामुळे शेतकऱ्यांना बाराही महिने कोरडवाहू शेतीत बागायती पिके घेता येणार आहे. याचा मोठा फायदा हा आपल्या टाकेद व परिसरातील ग्रामस्थ नागरिकांना शेतकरी बांधवांना महिला माता बघिणींना येणाऱ्या काळात होणार आहे. आजच्या मीटिंग प्रसंगी या उपक्रमात सकारात्मक चर्चा झाली याप्रसंगी नाबार्ड चे अमोल लोहकरे, बायफ चे प्रोग्रॅम मॅनेजर सुरेश सहाणे, संदीप पवार बायफ सिनिअर प्रोजेक्ट अभियंता, बायफ चे थेटे सर, प्रगतिशील शेतकरी जगण घोडे, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शेतकरी मित्र हरीचंद्र जोशी आदींसह घोडेवाडी ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. यावेळी शेतकरी जगणं घोडे यांनी प्रमुख उपस्थित मान्यवरांचा गावच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here