नाशिक : कोल्हापूर येथे पार पडलेल्या ६व्या राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत नाशिक मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सनराईज स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
कोल्हापूर येथील प्रिन्सेस पद्मावती हायस्कूल येथे २४ व २५ सप्टेंबर रोजी ६वी राज्यस्तरीय वरिष्ठ स्पर्धा पार पडली. ज्यात यजमान कोल्हापूरसह एकूण दहा जिल्ह्यांच्या १५० खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन स्पर्धेत सादर केले. यावेळी सांघिक प्रकारात नाशिकच्या संघाने दुहेरी मुकुट पटकावला. तसेच विविध गटात वडनेर येथील सनराईज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
यावेळी पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळयाला शिवछत्रपती पुरस्कार विजेते शेषनारायण लोंढे, महाराष्ट्र जम्प्रूटचे खजिनदार पांडुरंग रणमाळ, राज्य सूर्यनमस्कार असोसिएशनचे सचिव दीपक निकम, महाराष्ट्र इनडोअर फुटबॉलचे खजिनदार शिवकुमार कोळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितिन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, चांदवड तालुका संचालक डॉ. सयाजी गायकवाड व अन्य संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी प्रा. संजय पाटील आणि सनराईज स्कुलच्या प्राचार्या अनिता नायडू यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
सांघिक प्रकार –
मुले : १) नाशिक, २) लातूर, ३) कोल्हापूर
मुली : १) नाशिक, २) कोल्हापूर, ३) बीड
मिक्स डबल : श्रावणी सोनवणे व श्रेयस डोखळे, सनराईज स्कूल, वडनेर – प्रथम
डबल मुली : आर्य निकम व ईश्वरी निफाडे, सनराईज स्कूल, वडनेर – द्वितीय
सिंगल मुले : शिवम तिडके, सनराईज स्कूल, वडनेर – द्वितीय
सिंगल मुली : अवनी माडगे, सनराईज स्कूल, वडनेर – द्वितीय
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम