पुन्हा वाद; सरचिटणीस पदाच्या मतपत्रिकेवर आक्षेप

0
8

सरचिटणीस पदाची मत पत्रिका वैद्य की अवैध यावरून दोघं पॅनल प्रतिनिधीमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती आहे, यावेळी अधिकारी काजळे यांना प्राचारन केले मात्र वाद मिटत नसल्याने अधिकारी चौरे यांना बोलवण्यात आले यानंतर वाद मिटला असून सद्या मतमोजणी सुरळीत सुरू असून पहिल्या फेरीचा निकाल 15 मिनिटात येण्याची अपेक्षा आहे.

साठी काल मतदान झाले असून आज सकाळ पासून मतमोजणी सुरू आहे. एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या( MVP) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी सकाळपासून मतमोजणी सुरू होण्याआधीच या मतमोजणीला गालबोट लागला आहे. निकाल रात्री उशिरा येण्याची शक्यता वाढली आहे.

एक मतपत्रिका गहाळ असल्याचे समोर आले असून उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण ३ चिठ्ठ्या नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याने उमेदवार आक्रमक झाले आहेत. उमेदवारांनी याबाबत तक्रार केली असून या चिठ्ठ्या सापडल्याशिवाय मतमोजणीस प्रारंभ करू नये, अशी मागणी देखील उमेदवारांनी केली आहे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here