MVP निवडणुकीची तारीख जाहीर; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

0
14

नाशिक : नाशिक जिल्ह्यात सद्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील प्रतिष्ठित अशा नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (NDMVP Education) पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम (Election Program Announced) जाहीर झाला आहे. यामुळे अनेकांनी राजकिय बाशिंग बांधले असून MVP त जाण्याची तयारी आखली आहे.

पाच ऑगस्ट पासून उमेदवारी अर्ज मिळणार आहेत ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान घेतले जाणार आहेत. दि.२८ ऑगस्टला मतदान, तर २९ ऑगस्टला मतमोजणी निकाल जाहीर होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वांत मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या मविप्र संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची मुदत ऑगस्टमध्ये संपते असून सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. पाच ऑगस्ट पासून उमेदवारी अर्ज उपलब्ध होणार आहेत. मतदार याद्या, घटना व निवडणूक नियमावली निवडणूक मंडळ कार्यालयात विक्रीसाठी असणार आहे. दि.१५ ऑगस्ट ही सार्वजनिक सुटी वगळता इतर सुट्यांच्या दिवशी निवडणूक कार्यालयातील कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

निवडणूक संदर्भात रविवारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मविप्र निवडणुकीसाठी एक सदस्यीय लवादाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

निवडणूक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ऍड.भास्करराव चौरे यांना संस्थेतर्फे नेमणूक पत्र देण्यात आले. तर निवडणूक मंडळामध्ये सचिव म्हणून डॉ.डी.डी. काजळे हे काम पाहणार आहे. सदस्य म्हणून ऍड. रामदास खांदवे, ऍड. महेश पाटील हे त्यांना सहकार्य करतील. बैठकीस अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, (Dr Tushar Shewale) सरचिटणीस नीलिमा पवार (secretary Nilima Pawar), सभापती माणिकराव बोरस्ते व कार्यकारी मंडळ उपस्थित होते


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here