Murder : मेट्रो सिटी म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या बंगळुरू मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका टेक फार्माच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची एका जणाने निर्घुण हत्या केली आहे एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वेणू कुमार अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तर या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी याचे नाव फेलिक्स असल्याचं बोललं जात असून तो एरोनिक्सचा माझी कर्मचारी असल्याचं समजतंय.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका माजी कर्मचाऱ्यानी नामांकित अशा टेक कंपनीच्या कार्यालयातील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये शिरून तलवारीने हल्ला करत दोघा जणांची निर्घुण हत्या केली आहे. सायंकाळी कार्यालय बंद होण्याच्या सुमारे दोन तास आधी फेलिक्स या संशयिताने तलवार आणि चाकू घेऊन एरोनिक्सच्या कार्यालयात घुसत फणींद्र आणि विनू यांच्यावर थेट हल्ला चढवला. यात फणींद्र आणि विनू यांनी आपला बचाव करण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र फेलिक्सने त्यांना जीवे ठार केले. फेलिक्स कार्यालयात मध्ये तलवार आणि चाकू घेऊन शिरताच कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान या घटनेनंतर स्थानिक पोलिसांना फोन द्वारे माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच डीसीपी लक्ष्मीप्रसाद यांनी एरोनिक्स इंटरनेट कंपनीचे एमडी फनींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ विनू कुमार यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचाराधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान फेलिक्सने काही दिवसांपूर्वी कंपनी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्याच्या या व्यवसायात संबंधित दोघेही मयत कथितपणे अडथळा आणत होते. यामुळे फेलिक्सने रागाच्या भरात तलवार घेऊन कंपनीच्या कार्यालयात शिरला आणि फणींद्र तसेच वीनू यांच्यावर जीवघेणा हल्ला करून फरार झाला. या हत्येतील आरोपी फेलिक्स टिक टॉक आणि रील्स व्हिडिओ बनविण्यासाठी प्रसिद्ध असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम