Mumbai Crime | गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली असून, यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, अशीच एक माणुसकीला काळीमा फसणारी घटना ही राज्यात घडली असून, एका ३८ वर्षीय पुरुषाने ६४ वर्षीय वयस्कर महिलेवर बलात्कार करत तिला बेदम मारहाण करत जखमी केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे.(Mumbai Crime)
या घटनेत राहत्या घरातच ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार तसेच ह्या महिलेला मारहाण केल्याप्रकरणी ३८ वर्षीय आरोपी असलेला उमेश गुलाबराव ह्याला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी ह्या आरोपीच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३२५, ३२३ व ५०४ या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिलेची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Crime news | पत्नीवर संशय आला आणि जावयाने सासुरवाडीच संपवली
१६ वर्षीय मुलीवर बलात्कार
तसेच काल उघडकीस आलेल्या दुसर्या प्रकरणात, जम्मू – काश्मीर येथील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भधारणा केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईतील वांद्रे या परिसरातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ह्या पीडित अल्पवयीन मुलीला भेटताना ह्या प्रकरणी १९ वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. (Mumbai Crime)
या प्रकरणातील आरोपी हा मूळचा कुपवाडा ह्या जिल्ह्यातील असून, त्याने ऑगस्ट २०२२ पासून ते ह्या वर्षाच्या सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत मुंबईत नोकरी करत असतानाच्या काळात संबंधित पीडित अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलगी ही गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी या संपूर्ण घटनेची माहिती ही मुंबई पोलिसांना दिली. यानंतर या प्रकरणातील आरोपीला भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) तसेच लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या (POCSO) ह्या कलमांनुसार अटक करण्यात आली आहे.(Mumbai Crime)
Nashik Crime | नाशकात दारूवरून फटकारल्याने भाच्याने मामाचा केला खून
वेश्याव्यवसाय प्रकरण
दरम्यान, काल उघडकीस आलेल्या आणखी एका प्रकरणात, पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकत तब्बल सात महिलांची येथे सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून सुटका केली व या प्रकरणी दोन जणांना अटक देखील केली आहे. सोमवारी अवैध वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी छापा टाकला. दरम्यान, ह्या सुटका केलेल्या सातही महिलांना येथील पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर भारतीय दंड संहिता तसेच अनैतिक वाहतूक प्रतिबंध ह्या कायद्यानुसार विविध कलमांनुसार संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.(Mumbai Crime)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम