Mumbai Crime | अन् MSRDC सह-संचालकाच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली कार

0
61
Mumbai Crime
Mumbai Crime

Mumbai Crime |   राज्यात सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना ह्या वेगाने वाढत असून, आता राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा हा उपस्थित होत आहे. यातील बऱ्याच घटना ह्या प्रेम संबंधातून तर, काही घटना ह्या एकतर्फी प्रेमातून घडत असतात.

दरम्यान, अशीच एक हादरवणारी घटना आता पुन्हा उघडकीस आली आहे. प्रियकराचं विवाहित असल्याचं गुपित फुटलं आणि MSRDC च्या सह-संचालकाच्या मुलाने त्याच्या प्रेयसीच्या अंगावर थेट कार घातली. दरम्यान, महिला आयोगाने ह्या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणी आरोपी असलेला अश्वजित गायकवाड हा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा चिरंजीव आहे आणि त्याने त्याच्या प्रेयसीच्या अंगावर गाडी घालत तिला गाडी खाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.(Mumbai Crime)

Pune Crime | कारच्या धक्क्याने वाद… टोळक्याने केला तरुणावर हल्ला; भाच्यासमोर मामाची हत्या
MSRDC चे सहसंचालक असलेले अनिलकुमार गायकवाड यांच्या मुलाने त्याच्या मित्रांच्या मदतीने स्वतःच्या प्रेयसीलाच क्रूरपणे जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणी आरोपी तरुण हा विवाहित असल्याचं गूढ समोर आल्यानंतर त्याच्या प्रेयसीने त्याला जाब विचारला असता, त्याने ड्रायवरच्या मदतीने थेट तिला संपविण्याचा कट रचला.

दरम्यान, यात पीडित तरुणी ही गंभीररित्या जखमी झाली असून, या प्रकरणाची दखल ही राज्य महिला आयोगाने घेतलेली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी संबंधित जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल मागवला आहे. आरोपी अश्वजित गायकवाड (वय ३४) याने त्याच्या प्रेयसीच्या अंगावर चारचाकी घालत तिला कारखाली चिरडत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.(Mumbai Crime)

Beed Crime | शाळेत शिक्षिकांचे अश्लील कृत्य, घटनेमुळे विद्यार्थी हादरले

नेमकं काय आहे प्रकरण..?| Mumbai Crime

आरोपी असलेला तरुण अश्वजीत गायकवाड आणि संबंधित तरुणी प्रिया सिंह यांच्यात मागील साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, त्याचे लग्न झालेले असून, तो विवाहित असल्याचे त्याने तिच्यापासून लपवले होते. दरम्यान, सोमवार रोजी रात्री तिला याबाबत कळाले असता. तिने आरोपीला फोन केले आणि आरोपीने तिला घोडबंदर रोडवरील ओवळा येथील कोर्टयार्ड हॉटेलजवळ (Mumbai Crime) बोलावले.

ती तिथे पोहोचताच त्यांच्यात जोरदार भांडण झालं आणि रागाच्या भरात त्याने त्याच्या ड्रायव्हर सागर याला तिच्यावर गाडी घालायला सांगितली. आज्ञाधारक ड्रायव्हरनंही त्याचं ऐकलं आणि त्याची आलिशान रेंज रोव्हर डिफेन्डर ही गाडी त्यानं थेट तिच्या अंगावर चढावली.

आणि त्यानंतर तिला जखमी अवस्थेत सोडून त्यांनी तिथून पळ काढला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं आणि त्याने या संबंधी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेत तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान, यानंतरही आरोपीचे काही मित्र हे रुग्णालयात जाऊन तिला धमक्या देत होते. त्यामुळे प्रियाने ह्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेबाबतची माहिती कळवली आहे.(Mumbai Crime)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here