मनपा आयुक्तांकडून मल्टीमॉडेल हबची पाहणी; तिन्ही ट्रान्स्पोर्टचे जंक्शन एकाच ठिकाणी

0
29

नाशिक – महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महारेल व मेट्रो नियोच्या अधिकाऱ्यांसह नाशिकरोडजवळील सिन्नर फाटा येथे उभारल्या जाणाऱ्या मल्टीमॉडेल हबची पाहणी केली.

नाशिकची पहिली टायरबेस मेट्रो निओ प्रकल्प, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे लाईन (महारेल) आणि महापालिकेची सिटीलिंक बस या तिन्ही कंपन्यांच्या प्रकल्पांचे पॅसेंजर टर्मिनल, बस डेपो हे सर्व एकाच ठिकाणी इथे असणार आहे. यासंदर्भात आयुक्तांनी मल्टीमॉडेल हब विकसित करण्याच्या दृष्टीने संबंधित तिन्ही कंपन्यांच्या अधिका-यांशी चर्चा केली.

नाशिकरोडपासून अवघ्या ४ किमी दूर असलेल्या सिन्नरफाट्याजवळील १६ एकरच्या जागेत हा मल्टीमॉडेल हब उभारला जात आहे. हा हब विकसित होण्याच्या दृष्टीने तिन्ही कंपन्यांचे प्रयत्न सुरु असून त्याचाच भाग म्हणून आयुक्तांनी ह्याची पाहणी केली. आणि निओ मेट्रो, महारेल आणि सिटीलिंक या तिन्ही कंपन्यांमध्ये योग्य समन्वय राहावा, एकत्रित नियोजन व्हावे यादृष्टीने त्यांनी तिन्ही कंपन्यांच्या अधिका-यांशीदेखील संवाद साधला आहे.

शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सुनील रौंदळ, उपअभियंता निलेश साळी, महारेलचे अशोक गरुड, पराग घोलप, महामेट्रोचे विकास नागुलकर आदी अधिकारी ह्या पाहणीवेळी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here