Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी बँकेकडून महिलांची पिळवणूक

0
39
#image_title

Ladki Bahin Yojana | राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू झाली असून महिलांना देण्यात येणारे हे मानधन बँका कर्जाच्या वसुलीसाठी कापून घेत आहेत. तर केवायसी तसेच इतर नियम समोर करून महिलांना योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. या संदर्भात अनेक महिलांनी शिवसेनेचे नेते शैलेश ठाकूर यांच्यासोबत बैठक घेत सरकारचा निषेध केला आहे. तर शैलेश ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यां सोबत बैठक घेऊन संताप व्यक्त केला आहे.

Ladki Bahin Yojna | सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेल्या महिलांना ‘या’ दिवशी मिळणार पैसे; अदिती तटकरेंनी दिली माहिती

योजनेचे पैसे मिळू नाही महिला लाभापासून वंचित

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे अर्थसहाय्य वेळेत मिळायला पाहिजे असे शासकीय बंधन असूनही काही महिला भगिनींच्या बँक खात्यांवर त्यांनी बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम न भरली गेल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अर्थसाहयातून इंडुसन बँक शाखा घाटंजी येथून नियमबाह्यरित्या कापून घेत आहे. त्यामुळे पैसे जमा होऊनही संबंधित महिला भगिनींना या अर्थसहाय्यापासून वंचित रहावे लागत आहे. अशाप्रकारे रक्कम कापण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे नकार दिला असूनही रक्कम कापली जात असल्याने ही बाब निषेधार्थ आहे. संबंधित बँकांना योग्य ती सूचना देऊन कार्यवाही करावी अन्यथा घाटंजी शहरातील लाडक्या बहिणी 30 सप्टेंबरला धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.

शासन दरबारी फेऱ्या मारूनही महिलांच्या अडचणी तशाच

आधीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना खाते उघडण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यात आता खात्यात पैसे आल्यानंतरही त्यांच्या अडचणी कमी होत नाहियेत यातून महिला अडचणीत आल्या असून लाभ मिळवण्याकरिता महिलांना शासनाच्या दरबारी फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यातूनही काही निशपन्न होत नसल्याकारणाने महिलांकडून संताप व्यक्त केला जातोय. लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी अनेक महिलांनी बँकेकडे कागदपत्रे जमा केल्यानंतर मागील एक महिन्यापासून बँकेने बऱ्याच केवायसी प्रलंबित ठेवल्या आहेत. या विरोधात आवाज उठवीत घाटंजीचे माजी नगरसेवक सय्यद फिरोज, माजी नगरसेवक विक्रम ठाकूर, संदीप दिंकुडवार, रोशन मुद्दलवार, सय्यद मुजीब यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.

Supreme Court | ‘अन्यथा लाडकी बहीण योजना बंद करा’; सुप्रिम कोर्टाने सरकारला सुनावले

निवेदनकर्त्यांकडून आंदोलनाचा इशारा

विधानसभा निवडणूक लक्षात घेत महायुती सरकारने लाडकि बहिण योजना सुरू केली. परंतु बँका मात्र या योजनेचे तीन तेरा वाजवत असून सरकारी यंत्रणा सुद्धा हा विषय गंभीरतेने घेत नाहीये. सरकारी यंत्रणेने हा विषय गंभीरतेने न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. असा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेच्या नावाखाली महिला लाभार्थ्यांकडून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आर्थिक लूट केली जात आहे. हा प्रकार सर्वत्र सुरू असताना यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प बसली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here