मुंबई – देशभरात गाजलेल्या अँटिलिया प्रकरणानंतर आज अंबानी कुटुंबाला पुन्हा एकदा धमक्या आल्या आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, अशी बातमी पसरली आहे. यामुळे राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या त्याची पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्योग जगतात आपले वर्चस्व जमावणारे रिलायन्स उद्योग समुहामुळे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत विराजमान होणारे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला वारंवार धमकी मिळाल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याची बातमी अनेकदा समोर आहे. मुकेश अंबानी व कुटुंबियांना ‘पुढील तीन तासांत संपवण्याची धमकी देणारे’ काही फोन आल्यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.
रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या लँडलाईनवर हा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांचे नाव घेऊन ही धमकी दिली. या फोननंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हे धमकीचे फोन करणारी व्यक्ती मनोरुग्ण असल्याचा प्राथमिक अंदाजही आता व्यक्त केला जात आहे. तरी अद्याप पोलीस चौकशीनंतर सर्व लवकरच स्पष्ट होणार आहे.
देशभरात गाजलेल्या अँटिलिया प्रकरणात मुकेश अंबानींवर थेट घराबाहेर मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यामुळे अनेक व्यक्तींसह पोलीस अधिकारीही रडारवर आले होते. त्यातच माजीमंत्री अनिल देशमुख, अधिकारी सचिन वझे ह्यांना अटक झाली होती. आता ह्या प्रकरणानंतर अंबानींना जीवे मारण्याची धमकी आल्याने यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम